• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हृतिकचं प्रेम माझ्यासाठी मृत्यूसमान, फक्क अपमान आणि…, कंगना राणौत यांनी ब्रेअपचा खुलासा केला तेव्हा…

August 2, 2026 by admin Leave a Comment


Hrithik Roshan – Kangana Ranaut : सध्या सोशल मीडियावर ‘जगला हृतिक रोशनची माफी मागायला हवी…’ ट्रेंड करत आहे… त्यावर अभिनेत्याने प्रतिक्रिया देखील दिली. पण अभिनेत्याची प्रतिक्रिया कंगना यांना खटकली आणि त्यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेरअ करत अभिनेत्यावर संताप व्यक्त केला. पण ही पहिली वेळ नाही जेव्हा, कंगना आणि हृतिक यांचे वाद चव्हाट्यावर आले आहे. याआधी देखील दोघांचे वाद सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत होते. सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा कंगना आणि हृतिक यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला.

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना – हृतिक यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होत्या. सांगायचं झालं तर, दोघांच्या अफेअरच्या जेवढ्या रंगल्या नाहीत, तेवढ्या त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी दोर धरला.. खुद्द कंगना यांनी हृतिक याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, हृतिकवर प्रेम करणं माझ्यासाठी मृत्यूसमान होतं… असं देखील कंगना म्हणाल्या होत्या…

सांगायचं झालं तर, एका नाईट पार्टीतील लीक झालेल्या फोटोंमुळे हृतिक रोशन आणि कंगना राणौत यांच्या अफेअरच्या अफवांना दुजोरा मिळाला. या फोटोंमध्ये कंगना राणौत आणि हृतिक रोशन खूपच रोमँटिक मूडमध्ये दिसले. हृतिक रोशन याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कंगना यांनी एका मुलाखतीत नात्याबद्दल मोठा खुलासा केलेला. कंगना म्हणालेल्या, ‘मी खूप मोठा अपमान सहन केला आहे … ज्याचा कोणताही हिशेब नाही. मी रात्रभर रडत असायचे… मला झोप देखील यायची नाही… त्याच्यावर प्रेम माझ्यासाठी मृत्यूसमान होतं…’, असं कंगना म्हणालेल्या.

कंगना हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर, हृतिक यांचं पत्नी सुझान खान हिच्यासोबत देखील घटस्फोट झाला. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील, सुझान हिन हृतिक याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर हृतिक याच्या आयुष्यात सबा आजाद हिची एन्ट्री झाली. अभिनेत्याने सबा हिच्यासोबत असलेलं नातं सर्वांसमोर स्वीकारलं देखील आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती
  • 91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in