
हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. शास्त्रात अनेक अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केल्यात घरात अनेक वाद निर्माण होई शकतात. हिंदू धर्म आणि वास्तूशास्त्रानुसार, अनेक झाडे आणि वनस्पती अत्यंत शुभ मानल्या जातात. एवढंच नाही तर, असं देखील म्हणटलं जातं की, झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये देव वास करतो. याच कारणामुळे घरात तुळस आणि शामी यांसारख्या शुभ वनस्पती लावल्या जातात. झाडे लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. परंतु काही विशिष्ट झाडे लावणे अशुभ मानले जाते. या झाडांची सावली घरात पडणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात ही तीन झाडे लावल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वास्तुशास्त्रज्ञांच्या मते, या झाडांची सावली घरावर आणि कुटुंबावर पडल्याने प्रगती, आनंद, समृद्धी आणि कल्याण कमी होते. म्हणूनच ही झाडे घरापासून दूर लावण्याचा सल्ला दिला जातो. तर चला पाहूया, घरात कोणती तीन झाडे लावू नयेत.
ही झाडे तुमच्या घरात लावा
पिंपळ: सनातन धर्मात पिंपळाच्या झाडाला मोठे महत्त्व आहे. ते पवित्र मानले जाते. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की पिंपळाचे झाड हे देव आणि पूर्वजांचे निवासस्थान आहे. त्याची पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात, परंतु वास्तूनुसार त्याची सावली घरावर पडणे अशुभ मानले जाते, म्हणून ते घरात लावू नये. पिंपळाच्या झाडात खूप प्रबळ ऊर्जा असते, ज्याचा कौटुंबिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो.
चिंच: घराजवळ चिंचेची झाडे लावू नयेत. असे मानले जाते की, ज्या घरात चिंचेच्या झाडाची सावली पडते, त्या घरातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. यामुळे पती-पत्नीमध्ये तणाव आणि कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो.
काटेरी झाडे: घरात बाभूळ किंवा निवडुंगासारखी काटेरी झाडे लावण्यास मनाई आहे. वास्तूनुसार, त्यांच्या सावलीमुळे कौटुंबिक वाद, वाईट बोलणे आणि कटुता निर्माण होते. करिअर आणि वैयक्तिक जीवन असंतुलित होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply