• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही सुरुवात, आता मागे हटायचं नाही..; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया

July 25, 2026 by admin Leave a Comment


नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत चाललेल्या विद्यार्थ्यांच्या प्रचंड आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (शनिवार) राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘जंतर मंतर आणि देशभरातील परिस्थितीचा राष्ट्रविरोधी घटकांना फायदा होऊ नये, देश एकसंध राहावा, भारतातील विद्यार्थी कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नयेत आणि त्यांनी आपल्या अभ्यासावर, करिअरवर लक्ष केंद्रित करावं, हे सुनिश्चित करण्यासाठी मी पंतप्रधानांना माझी राजीनामा सादर केला आहे’, असं त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मराठी कलाकारांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘मेरे युवा साथिंयो! आता सुरूवात झालीय, आता मागे हटायचं नाही,’ अशा शब्दांत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे यांनी विद्यार्थी आंदोलकांचं अभिनंदन केलं आहे. तर ‘ज्यांनी ज्यांनी यासाठी लढा दिला, त्या सर्वांना प्रेम’, असं अभिनेत्री तेजस्विनी पंडितने लिहिलं आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा देशभरातून निषेध व्यक्त झाला होता. बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वातील असंख्य सेलिब्रिटींनी त्यावर संताप व्यक्त केला होता.

कलाकारांच्या पोस्ट-

दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घडामोड समोर आली आहे. बैठकीनंतर त्यांनी सांगितलं होतं की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने एक दिवसाची मुदत मागितली आहे.

3 मे 2026 रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेत अनियमितता आढळून आली होती. याची तात्काळ दखल घेऊन भारत सरकारने सीबीआयकडे तपास सोपवला आणि परीक्षा रद्द केली. त्यानंतर फेरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. 21 जून 2026 रोजी यशस्वीरित्या ही फेरपरीक्षा पार पडली.

पहिल्या दिवसापासून मी याची जबाबदारी घेतली आणि या परिस्थितीपासून कधीही दूर फिरलो नाही, असं धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं. तसंच कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचं भविष्य परीक्षा माफियामुळे उद्ध्वस्त होऊ देणार नाही, तसंच कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, हा माझा दृढनिश्चय होता, असं ते म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in