• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हार्दिक पंड्या दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात? महिकासोबतचा व्हिडिओ व्हायरल

June 28, 2026 by admin Leave a Comment

सध्या भारतीय संघ आयर्लंड दोऱ्यावर आहेत. दोन सामन्यांची मालिका असणार आहे त्यातील पहिला सामना रंगला ज्यात आयर्लंडचा विजय झाला आज दुसरा सामना आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंड दोऱ्यावर जाणार आहे. आता आयर्लंडविरुद्धत आणि इंग्लंडविरुद्ध या दोन्ही संघासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा एकच चर्चा रंगली आणि ती म्हणजे हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीची. हार्दिकला दोन्ही दोऱ्यासाठी संघात स्थान मिळालेले नाही. हार्दिकला दुखापत असल्यामुळे त्याला मालिकेत स्थान मिळू शकलेले नाही. आता हार्दिकबद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे. हार्दिकचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या मैदानाबाहेरील त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे. हार्दिकने त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत गुपचूप लग्न केल्याचे दावे मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. ही खळबळजनक अफवा तेव्हा सुरू झाली, जेव्हा हार्दिक पांड्या आणि मॉडेल महिका शर्मा यांचा एक अत्यंत खाजगी फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाला. या फोटोमुळे चाहते आणि नेटकऱ्यांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले असून, लोक या स्टार खेळाडूला त्याच्या आयुष्यातील या नवीन आणि दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीबद्दल सतत अभिनंदनाचे संदेश पाठवत आहेत. इंटरनेट आणि रेडिटसारख्या लोकप्रिय फोरमवर वेगाने फिरत असलेल्या या व्हायरल फोटोमध्ये, मॉडेल महिका शर्माच्या भांगेत गडद लाल रंगाचे कुंकू आणि कपाळावर मोठी टिकली स्पष्टपणे दिसत आहे. तिच्या शेजारी उभ्या असलेल्या स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या कपाळावरही एक मोठा टिळा दिसतो. फोटोमध्ये, हे सुंदर जोडपे एका वयस्कर महिलेसोबत उभे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Saraiya (@rohitsaraiya.official)

नताशासोबत घटस्फोट झाल्यानंतर, हे जोडपे 2025 पासून एकमेकांना डेट करत आहे. 2024 मध्ये अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत अधिकृत घटस्फोट झाल्यानंतर, हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांचे नाते सप्टेंबर 2025 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक झाले. ऑक्टोबर 2025 मध्ये, या जोडप्याने सोशल मीडियावर उघडपणे आपले प्रेम व्यक्त केले. माहिका शर्मा आयपीएल 2026 च्या सामन्यांदरम्यान आणि नंतर आयसीसी टी-20 विश्वचषकादरम्यान स्टँड्समधून हार्दिक पांड्याला पाठिंबा देताना दिसली होती.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Case: सियाचा खेळ खल्लास! सर्वात मोठा पुरावा हाती, केतनच्या वडिलांनीच…
  • विजय-त्रिशाच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना, प्रसिद्ध अभिनेत्री बनली माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी बायको
  • मुख्यमंत्री असावा तर असा.. ताफा सोडून थलपती विजय थेट निघाले बसमधून; ‘फिल्मी स्टाइल’वर नागरिकही फिदा!
  • शेती कामासाठी कॅनमधून 40 लिटर डिझेलला परवानगी? बळीराजाला सरकारचा दिलासा? मशागतीला वेग आला असताना मोठी अपडेट काय?
  • मोठा खुलासा! केतनला धक्का दिल्यानंतर या व्यक्तीला केला सियाने पहिला फोन, थेट 15 मिनिटे..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in