• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हाती माईक घेतला अन् गायलं गाणं, देवेंद्र फडणवीस यांचा वेगळा अंदाज; मुंबईत भाजपाची तिरंगा रॅली

August 10, 2026 by admin Leave a Comment


Devendra Fadnavis Song : मुंबईच्या वरळी येथे भाजपाने तिरंगा रॅलीचे आयोजन केले. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम तसेच भाजपाचे बडे नेते उपस्थित होते. या रॅलीदरम्यान भाजपाच्या नेत्यांनी हाती तिरंगा घेत रॅली काढली. यावेळी भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. ही रॅली सुरू होण्याआधी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. याच दरम्यान त्यांनी देशभक्तीपर गीत गायले. त्यांच्या या गीत गायनाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजपाने आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीला लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी आपल्या हातात तिरंगा घेतला होता. सोबतच खाली भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. फडणवीस यांनीदेखील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नावर भाष्य केले. “माझ्या देशभक्त बंधू-भगिनींचे मी स्वागत करतो. मला आज तिरंग्याचा महासागर पाहायला मिळतो आहे. ज्या तिरंग्यासाठी आमचे क्रांतीकार फासावर चढले. याच तिरंग्यासाठी आमच्या जवानांनी सीमेवर मरण पत्कारलं. त्यांच्यामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी तिरंगा फडकला. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा तिरंगा खाली येणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे. भारत सातत्याे प्रगती करत आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रात जे कोणालाच जमले नाही ते भारत करतो आहे. जगातला कुठलाच देश चंद्रावर यान उतरवू शकला नाही. हे भारताने करू शकलं,” अशी स्तुती फडणवीस यांनी केली.

भारत एक दिवस महासत्ता होणार

आयटी असो, एआय असो किंवा तंत्रज्ञान असो भारत स्पर्धा करत आहे. जगात सर्वाधिक युवा असलेला देश हा भारत आहे. या भारताला कोणीही थांबवू शकत नाही. काही शक्ती भारताला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये परकीय शक्ती आहेत. भारत एक दिवस जगातील सर्वात मोठी महासत्ता होईल, असा विश्वास देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, फडणवीस यांचे भाषण सुरू होण्याआधी मंचावर ‘दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये’ हे देशभक्ती गीत गायले. यात देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सहभाग घेतला. त्यांनीही हाती माईक घेत हे गीत गायले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in