
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर याठिकाणी तरुणांचं आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असंख्य तरुण, विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर याच आंदोलनाला समर्थन करत देशातील विविध राज्यांमध्येही तरुणांकडून आंदोलनं करण्यात येत आहेत. असंच एक आंदोलन बुधवारी मुंबईतील दादर परिसरात करण्यात आलं होतं. या जेन-झी आंदोलनातील विविध दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असताना सीजेपीकडून एका तरुणीचा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) शेअर करण्यात आला आहे.
मुंबईतील एका तरुणीचा व्हिडीओ कॉक्रोच जनता पार्टीकडून पोस्ट करण्यात आला आहे. तरुणीने थेट पोलिसांची गाडी अडवल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित तरुणीच्या साथीदारांना पोलीस नेत होते, तेव्हा ती पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहिली आणि त्यांना पुढे जाण्यापासून रोखलं. पोलिसांच्या व्हॅनसमोर उभं राहत तिने घोषणाबाजीही केली आहे. बुधवारी मुंबईतील दादर परिसरात तरुणांकडून सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं होतं. त्याच आंदोलनातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर जेन-झी सहभागी झाले होते.
पहा व्हिडीओ-
हमारी छोरिया छोरो से कम नहीं,
मुंबई में लड़कियां भविष्य सुरक्षित करने के लिए संघर्ष करती हुई।#मुंबई pic.twitter.com/91fugfBFM3
— Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 23, 2026
या आंदोलनामुळे दादर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. गर्दीला पांगवण्यासाठी तिथे पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेत व्हॅनमध्ये नेलं. आपल्या मित्रांना पोलिसांनी व्हॅनमध्ये नेल्याचं पाहिल्यानंतर ही तरुणी थेट व्हॅनसमोर निर्भिडपणे उभी राहिली. गाडीला अडवत ती घोषणा देत राहिली. यावेळी तिच्यासोबत इतर तरुणांनीही घोषणा दिल्या आणि तिचा व्हिडीओदेखील शूट केला. हाच व्हिडीओ सीजेपीच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘आमच्या मुली मुलांपेक्षा कमी नाहीत. मुंबईतील ही मुलगी तिच्या भविष्यासाठी संघर्ष करतानाची ही दृश्ये’ असं कॅप्शन देत कॉक्रोच जनता पार्टीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी दादरमध्ये आयोजित मोर्चासाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यापैकी 900 हून अधिक विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Leave a Reply