• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मारली दांडी, 2 वर्षांपूर्वींचा वाद कायम..

August 15, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीत लाल किल्ल्यावर भव्य स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र, इतक्या मोठ्या कार्यक्रमाला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे सहभागी झाले नाहीत. शेवटचे या कार्यक्रमाला राहुल गांधी 2024 मध्ये सहभागी झाले होते. मात्र, दोन वर्षांपासून त्यांनी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलीये. 2024 मध्ये त्यांच्या आसनावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रक्षा मंत्रालयाकडून दोन्ही नेत्यांना स्वतंत्र दिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यास आले होते. मात्र, राहुल गांधी आणि खर्गे दोघांनीही 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला दांडी मारली. यामागील कारण 2024 मध्ये आसनव्यवस्थेवरून निर्माण झालेला वाद. 2024 मध्ये 15 ऑगस्टच्या कार्यक्रमातील आसन व्यवस्थेवरून राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यांना 5 व्या रांगेत बसवण्यात आल्याने त्यावेळी त्यांनी नाराजी जाहीर केली. त्यावेळी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. राहुल गांधी यांना मागच्या रांगेत स्थान मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यादरम्यानच आजच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे.

भारतात लोकशाही असून मार्गदर्शन करणारे संविधान आहे. काही लोक भारताच्या फायद्याचा विचार करत नाहीत. अशा लोकांपासून वाचले पाहिजे. यादरम्याचन नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांसाठीही काही मोठ्या घोषणा केल्या. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात नरेंद्र मोदी नक्की काय घोषणा करणार, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. त्यातच त्यांनी खासगी कोचिंग क्लासेसवर भाष्य केले.

देशाच्या स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन दिल्लीत करण्यात आले. राहुल गांधी यांना निमंत्रण असूनही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. 2024 मध्ये झालेल्या वादानंतर आणि नाराजीनंतर ते या कार्यक्रमाला हजर राहत नाहीत. मात्र, यावरून सत्ताधारी आता निशाणा साधताना दिसत आहेत. 2024 मध्ये राहुल गांधी यांना 5 रांगेत बसवण्यात आल्याने त्यांनी आपली नाराजी जाहीर केली होती. तेव्हापासून ते या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यंदा तरी राहुल गांधी स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? यावरून चर्चा होती. मात्र, त्यांनी यावेळीही पाठ फिरवली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in