• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तान हादरला! गृहमंत्र्यावर धाड-धाड गोळीबार… संपूर्ण देशात खळबळ

August 14, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तान आज स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या खास दिवशी बलुचिस्तान प्रांताचे गृहमंत्री मीर जियाउल्लाह लांगो यांच्या ताफ्यावर शुक्रवारी मस्तुंग जिल्ह्यातील खद कूचा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जण जखमी झाले. या हल्ल्यातून बलुचिस्तानचे गृहमंत्री थोडक्यात बचावले असून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बलुचिस्तान अवामी पार्टीचे नेते आणि गृहमंत्री लांगो कलातहून क्वेटाकडे प्रवास करत होते. त्यांचा ताफा मस्तुंग जिल्ह्यातील खद कूचा परिसरातून जात असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या ताफ्याला लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींमध्ये 3 पोलीस कर्मचारी

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारांसाठी क्वेटा येथे हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये तीन पोलीस कर्मचारी आहेत, तर इतर जखमींची ओळख अद्याप समोर आलेली नाही.

शोधमोहीम सुरू

हल्ल्याची घटना घडल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संयुक्त शोधमोहीम राबवली जात आहे. मीर जियाउल्लाह लांगो हे बलुचिस्तान अवामी पार्टीशी संबंधित असून, मार्चमध्ये शपथ घेतल्यापासून ते प्रांताच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. या भागात यापूर्वीही मंत्री आणि सुरक्षा दलांच्या ताफ्यांवर फुटीरतावादी आणि दहशतवादी गटांकडून हल्ले झाले आहेत.

पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू

दरम्यान, आजच उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये अज्ञात दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यात एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला, तर आणखी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. शुक्रवारी पहाटे अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील बरंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोही सार पोलीस तपासणी चौकीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. याशिवाय पंजाब प्रांतात प्रतिबंधित संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)च्या सशस्त्र सदस्यांनी दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in