• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोहैल खानने स्वीकारली घटस्फोटाची संपूर्ण जबाबदारी; म्हणाला “जी चूक झाली ती सर्व..”

July 9, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सलमान खानचा भाऊ सौहेल खानने 2020 मध्ये पत्नी सीमा सजदेहशी घटस्फोट घेतला. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर या दोघांनी हा कठीण निर्णय घेतला होता. सोहैलपासून विभक्त झाल्यानंतर सीमा अनेकदा याविषयी विविध कार्यक्रमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली. मात्र आता सोहैल खानची पहिल्यांदा प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘अलायन्स’ या शोमध्ये सोहैल आणि सीमा दोघं एकत्र दिसले. नुकताच या शोचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सोहैल आणि सीमा एकमेकांसमोर होते. यावेळी घटस्फोटाबद्दल बोलताना सोहैलने सर्व जबाबदारी स्वीकारली आहे.

या प्रोमोमध्ये सूत्रसंचालक कुणाल खेमू हा सोहैलला विचारतो की, पूर्व पत्नी सीमाला शोमध्ये पाहून त्याला कसं वाटतंय? त्यावर सोहैल म्हणतो, “खूपच छान वाटतंय. या सुंदर महिलेसोबत मी माझ्या आयुष्याची 25 वर्षे घालवली आहेत. मी नॅशनल टेलिव्हिजनवर हे मान्य करतो की, आमच्या नात्यात कधीही कोणतीही चूक झाली असेल, तर त्याची सर्व जबाबदारी मी घेतो.” सोहैलची ही कबुली ऐकल्यानंतर सीमा खुश होते आणि इतर स्पर्धकसुद्धा टाळ्यांचा कडकडाट करतात. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘खरा मर्द असाच असतो’, असं एकाने म्हटलंय. तर ‘खान कुटुंबाचे संस्कार असेच आहेत’, अशा शब्दांत दुसऱ्याने कौतुक केलं. ‘यालाचं खरं नातं म्हणतात, हा आदर आहे’, असं आणखी एका युजरने लिहिलं आहे.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Alliance Amazon Prime (@allianceshow_official)

सीमा सजदेह आणि सोहैल खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना योहान आणि निर्वाण ही दोन मुलं आहेत. लग्नाच्या 25 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतर दोघं मिळून दोन्ही मुलांचं संगोपन करत आहेत. एका मुलाखतीत सीमने म्हटलं होतं की, जरी ती सोहैलपासून विभक्त झाली असली तरी खान कुटुंबाशी तिचं नातं कायम राहील. “माझ्यासाठी ते नेहमीच माझं कुटुंब असेल. माझी दोन्ही मुलं तिथे राहतात. घटस्फोट घेतला म्हणजे मी त्यांच्याशी माझं नातं तोडलं असा अर्थ होत नाही. मी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘द खान फॅमिली’चा टॅग काढून टाकणं महत्त्वाचं नव्हतं, तर माझी वेगळी ओळख निर्माण करणं गरजेचं होतं. सोहैल माझ्या मुलांचा पिता आहे आणि कायम राहील, अशा शब्दांत ती व्यक्त झाली होती.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मॅन्युअल ट्रान्समिशन म्हणजे काय? जाणून घ्या हे कसे काम करते, याचे फायदे आणि तोटे
  • डुकाटीची नवी ‘Diavel V4 Black’ भारतात लाँच, टॉप स्पीड पाहिलात का?
  • ‘सैराट’मधल्या सल्याच्या व्हिडीओनंतर FDA ची तडकाफडकी मोठी कारवाई
  • नितिन गडकरी यांच्यावर राज ठाकरेंची जोरदार टीका, थेट म्हटले, पेट्रोलमध्ये इथेनॉल कसं घालायचं यावरच..
  • IT क्षेत्रातील घसरणीनंतरही देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड योजनेचा ‘मास्टरस्ट्रोक’; इन्फोसिस, टीसीएस आणि एचसीएलवर विश्वास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in