• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोनम वांगचुक आपल्या Youtube चॅनलने किती कमाई करतात ? या कमाईवर कर भरतात का ?

July 19, 2026 by admin Leave a Comment


Sonam Wangchuk YouTube Income: पर्यावरण कार्यकर्ते आणि संशोधक सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे ते देशभर चर्चेत आहेत. त्यांच्या उपोषण सुरु असताना पोलिसांनी त्यांना दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल केले आहे. लडाख येथील पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे प्रयोगामुळे आणि उपोषणामुळे ते प्रचंड चर्चेत असताना सोनम वांगचुक यांनी त्यांच्या YouTube चॅनलने किती कमाई करतात आणि ते या कमाईवर टॅक्स भरतात का ? अशी त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

सोनम वांगचुक यांची कमाई किती ?

सोनम वांगचुक यांचे वांगचुक वर्ल्ड (Wangchuk World ) नावाचे YouTube चॅनल असून त्याचे लाखो सब्सक्रायबर आहेत. या चॅनलमुळे त्यांना दर महिन्याला सुमारे ३ ते ७ लाख रुपयांची कमाई होऊ शकते. याशिवाय सोनम वांगचुक यांना अन्य मार्गाने देखील कमाई होत असते. युट्युब शिवाय सोनम यांना देश आणि विदेशात लेक्चर, कॉन्फ्रस आणि मोटिवेशनल स्पीकींगमुळे देखली कमाई होते. त्यांची नेटवर्थ सुमारे ७५ लाख रुपये आहे.

YouTube च्या कमाईवर टॅक्स लागतो का ?

भारतात YouTube, AdSense, स्पॉन्सरशिप, एफिलिएट मार्केटिंग आणि डिजिटल प्लेटफॉर्मने होणारी कमाईवर कर आकारला जातो. त्याला सर्वसाधारणपणे बिझनस आणि डिजिटल प्लॅटफॉर्मपासून होणारी कमाई म्हटले जाते. तसेच कमाईतून जोडलेला खर्च काढल्यानंतर उरलेल्या रकमेवर टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागतो. जर तुमचा ठरलेल्या मर्यादेहून जास्त कमाई झाल्यानंतर GST शी संबंधित नियम देखील लागू होऊ शकतात.

सोनम वांगचुक सरकारला कर भरतात का?

सोनम वांगचुक यांनी स्वतः सार्वजनिक कार्यक्रमात अनेक वेळा सांगितले आहे की ते त्यांच्या उत्पन्नावर नियमितपणे कर भरतात. लडाखच्या काही विशिष्ट भागांतील रहिवाशांना विशेष आयकर सवलत मिळत असली तरी, सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे की, त्यांच्या उत्पन्नावर आधारित कराची संपूर्ण रक्कम सरकारला भरणे हे ते आपले नैतिक कर्तव्य मानतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाळासाहेबांचं नाव वापरून कोट्यवधींचा… प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप
  • भारत बांगलादेशच्या संबंधांवर थेट परिणाम, पुन्हा बांगलादेशने तेच केले, पाकिस्तानच्या नादाला लागून..
  • BCCI Rule: रोहित-विराटला खटकलं अन् बीसीसीआयने नियमच बदलला, 10 संघांना तातडीने आदेश दिला
  • Pratap Sarnaik : मंत्री प्रताप सरनाईक-नरेंद्र मेहता वाद पेटला; थेट राजीनाम्यावर प्रकरण पोहोचलं, कोण काय म्हणालं?
  • प्रचंड रोमँटिक गाणं, 100 वेळा ऐकूनही भरत नाही मन, 36 वर्षांपासून प्रेक्षकांचं प्रचंड आवडीचं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in