• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सेल्फी घेण्यासाठी आली अन् थेट बळजबरी ओठांवर केलं किस, निकिता रावलचा Video तुफान व्हायरल

August 9, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री आणि डान्सर निकिता रावल सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. एका अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवर फोटो काढताना एका महिला चाहतीने निकितासोबत सेल्फी घेतली आणि त्यानंतर अचानक तिच्या ओठांवर किस केले. या अनपेक्षित प्रकारामुळे निकिता काही क्षणांसाठी अस्वस्थ आणि हैराण झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अवॉर्ड शोदरम्यान निकिता रेड कार्पेटवर पापाराझींसाठी पोझ देत होती. त्याचवेळी एक महिला चाहती तिच्याजवळ आली आणि सेल्फी काढण्याची विनंती केली. निकितानेही हसत तिच्यासोबत फोटो काढला. मात्र त्यानंतर चाहतीने आधी तिच्या गालावर किस केले आणि अचानक तिच्या ओठांवर किस करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारामुळे निकिता रावलला धक्का बसल्याचे दिसते. ती काही क्षणांसाठी घाबरलेली आणि अस्वस्थ झाल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. घटनेनंतर ती लगेच उभी राहिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या प्रकारावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण हा प्रकार स्टंट असल्याचे म्हणत आहेत तर अनेकांनी चाहतीच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे.

कोण आहे निकिता रावल?

निकिता रावल ही अभिनेत्री, डान्सर असून हॉटेल व्यवसायाशीही संबंधित आहे. तिने 2007 मध्ये ‘मिस्टर हॉट मिस्टर कूल’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘ब्लॅक अँड व्हाइट’, ‘द हिरो अभिमन्यू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तिने बॉलिवूडसोबतच दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.

अभिनयासोबतच निकिता एक प्रशिक्षित कथक नृत्यांगना आहे. तिने राष्ट्रीय स्तरावर कथक नृत्याचे सादरीकरण केले आहे. अलीकडेच ती शिल्पा शेट्टी होस्ट करत असलेल्या ‘मां है ना’ या शोमध्येही दिसली होती. या कार्यक्रमात सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्स आपल्या आईसोबत कुकिंग चॅलेंजमध्ये सहभागी होतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Insider (@bollywoodinsider.in)

संग्राम सिंहसोबत जोडले गेले नाव

निकिता रावलचे नाव यापूर्वी अभिनेता आणि कुस्तीपटू संग्राम सिंह याच्यासोबतही जोडले गेले आहे. दोघे डेट करत असल्याच्या अफवा काही काळ चर्चेत होत्या. मात्र या डेटिंगच्या चर्चांवर निकिता किंवा संग्राम सिंह यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत
  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in