
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून संदीप पाठक ओळखला जातो. त्याने त्याच्या विनोदाच्या टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनात एक विशेष जागा निर्माण केली आहे. त्याने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मालिकेच्या सेटवरचा धक्कादायक किस्सा सांगितला आहे.
संदीप एका मुलाखतीमध्ये म्हणाला, “मी मुंबईत एका नामांकित प्रोड्यूसर आणि प्रसिद्ध डायरेक्टरच्या टीव्ही सीरियलमध्ये काम करत होतो. सेटवर १३-१४ अभिनेत्री, हेअर ड्रेसर, मेकअप आर्टिस्ट अशा एकूण १४-१५ मुली होत्या. शिवाय काही पुरुष कलाकारही होते. पण सेटवर फक्त एकच वॉशरूम होता.”
तो पुढे म्हणाला, “आपल्याकडे अजूनही एवढा सेन्स नाहीये. कमोडचा फ्लॅप वर ठेवायचा की खाली, यासाठीही बोर्ड लावावा लागतो. हे खेड्यात नाही, विमानातसुद्धा असं होतं. शहरातसुद्धा सिविक सेन्स किंवा बेसिक गोष्टींचा अभाव दिसतो.”
“मला हे पाहून खूप वाईट वाटायचं. १४-१५ मुली सेटवर काम करतायत, तरी त्यांच्यासाठी एकच वॉशरूम? मुलींच्या आरोग्याची आणि सोयीसुविधांची काळजी तरी कोणाला आहे का? मी याबाबत भांडलो आणि प्रॉडक्शन टीमची मिटिंग घेतली. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, ‘किमान मुलींसाठी एक स्वतंत्र वॉशरूम तरी द्या’” अशी मागणी संदीप पाठकने केली.
“आदर, आरोग्य आणि बेसिक सुविधा याबाबतीत अजूनही अनेक गोष्टी बदलायला हव्यात, असं मला वाटतं,” असं संदीपने आपल्या अनुभवातून सांगितलं.




Leave a Reply