• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सॅमसंगचा बॅक टू स्कूल सेल सुरू, या उत्पादनांवर 5 हजार रुपयांची भरघोस सूट

July 24, 2026 by admin Leave a Comment


सॅमसंगने भारतात गॅलेक्सी एआय डिव्हाइसेसवर ‘बॅक टू स्कूल’ ऑफर सुरू केली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सवलत आणि ‘गॅलेक्सी फॉरएव्हर’चे फायदे दिले जात आहेत. सॅमसंगच्या या सेलदरम्यान, विद्यार्थ्यांना निवडक गॅलेक्सी एआय डिव्हाइसेसवर 10% टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. याव्यतिरिक्त पाच हजार रूपयांपर्यंतच्या बँक ऑफर्स, नो-कॉस्ट ईएमआय आणि ‘गॅलेक्सी फॉरएव्हर’चे फायदे देखील उपलब्ध आहेत.

सॅमसंग सेलमध्ये गॅलेक्सी एआय-पॉवर्ड स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स, मॉनिटर्स आणि वेअरेबल्सवर अनेक आकर्षक ऑफर्स आहेत. गॅलेक्सी बुक6 प्रो, गॅलेक्सी टॅब एस11 अल्ट्रा, स्मार्ट मॉनिटर एम8 आणि गॅलेक्सी एस26 सिरीजवर सुद्धा मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध आहेत. विद्यार्थी त्यांच्या संस्थेने दिलेल्या ईमेल आयडीद्वारे किंवा UNiDAYS प्लॅटफॉर्मद्वारे आपली पात्रता पडताळून पाहू शकतात.

सॅमसंग सेल ऑफर्स

गॅलेक्सी बुक 6 प्रो ऑफर्स: मनीकंट्रोलनुसार एचडीएफसी बँक कार्डवर 5 हजार रूपयांच्या सवलतीचा लाभ येईल, ज्यामुळे या डिव्हाइसची सुरुवातीची किंमत 1 लाख 73 हजार 990 रूपयये होते. विद्यार्थ्यांसाठी 10% सूट देखील यावर देण्यात येणार आहे.

गॅलेक्सी टॅब एस11 अल्ट्रा: या सेलदरम्यान हा टॅब खरेदी करताना तुम्ही जर एचडीएफसी बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5 हजार रूपयांपर्यंतच्या लाभ घेता येईल. ज्यामुळे या डिव्हाइसची किंमत 1 लाख 17 हजार 999 रूपये होते. विद्यार्थ्यांसाठी 10% सवलत देखील आहे.

स्मार्ट मॉनिटर M8: स्मार्ट मॉनिटर वर तुम्हाला 3 हजार रूपयांपर्यंतच्या बँक कार्ड सवलतीसह उपलब्ध आहे, ज्यामुळे डिव्हाइसची किंमत 46 हजार 699 रूपये होते. याव्यतिरिक्त, 10% विद्यार्थी सवलत देखील आहे.

गॅलेक्सी फॉरएव्हरच्या माध्यमातून गॅलेक्सी एस26 सिरीजवर 50% पर्यंत बचत उपलब्ध आहे. गॅलेक्सी एस26 साठी ईएमआय दरमहा 3 हजार 917 रूपयांपासून आणि गॅलेक्सी एस26 अल्ट्रासाठी दरमहा 5 हजार 958 रूपयांपासून सुरू होतात. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी 7% सवलत आहे.

विद्यार्थ्यांसाठी गॅलेक्सी एआयची वैशिष्ट्ये

सॅमसंगच्या म्हणण्यानुसार नवीनतम गॅलेक्सी डिव्हाइसेसमध्ये शिक्षण आणि उत्पादकतेला सपोर्ट करण्यासाठी डिझाइन केलेली एआय-पावर्डवर चालणारी वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये लाइव्ह ट्रान्सलेट, चॅट असिस्ट आणि सर्कल टू सर्च विथ गूगल यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना विविध भाषांमध्ये संवाद साधण्यास, त्यांचे लेखन सुधारण्यास आणि ॲप्समध्ये स्विच न करता अधिक वेगाने माहिती शोधण्यास मदत करू शकतात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणं पुन्हा हादरलं! उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, प्रॉपर्टी हवी म्हणून केलं जायचं टॉर्चर!
  • भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ, नेमकं काय चुकलं?
  • ममता बँनर्जींच्या 20 बंडखोर खासदारांना भाजपचा सर्वात मोठा झटका, पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा घडामोडींना वेग
  • Kangana Ranaut : कंगना राणावतचं भाजपला धक्का देणारं विधान, थेट म्हणाली, मी काही भाजपची…
  • सुप्रिया सुळेंची NCP खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसोबत बैठक, नेमकं कारण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in