
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याचा निकाल अखेर लागला आहे. या सामन्यात भारताच्या विजयाच्या आशा होता. मात्र त्यावर सोनल दिनुषाने पाणी टाकलं. त्यामुळे हा सामना अखेर ड्रॉ झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे. भारत श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असला तरी मालिका भारताने 1-0 ने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देऊनही सामना जिंकण्यात अपयश आलं. श्रीलंकेच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. शुभमन गिलचे बचावात्मक नेतृत्व आणि पावसाचा व्यत्यय यामुळे भारताचा हातून विजय निसटला.
Leave a Reply