• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सूर्यग्रहण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार आणि लक्ष्मी मातेचा मिळेल आशीर्वाद

July 28, 2026 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी 12 ऑगस्ट रोजी वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आकाशात दिसेल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 17 मिनिटांनी सुरू होऊन 13 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजून 2‍5 मिनिटांपर्यंत चालेल. हे खग्रास सूर्यग्रहण आहे, पण चांगली बातमी ही आहे की सूर्यग्रहणाचा प्रभाव भारतात दिसणार नाहीये. हे ग्रहण युरोप, ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, उत्तर रशिया आणि आर्क्टिक प्रदेशात स्पष्टपणे दिसेल. हे सुर्यग्रहण संपेपर्यंत या देशांमध्ये अंधार असेल. दरम्यान ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार चंद्राची स्वामी राशी असलेल्या कर्क राशीत होणाऱ्या या ग्रहणासाठी लोकांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. जरी हे ग्रहण भारतातून दिसणार नसले आणि त्याचा सुतक काळही नसेल, तरी पारंपरिक मान्यतेनुसार जरी हे ग्रहण दिसत नसले तरी या खगोलीय घटनेचा प्रभाव जवळपास सर्व राशींवर पडेल आणि त्याचे परिणाम सुमारे 15 दिवस टिकू शकतात.

ज्योतिषांच्या मते हे सूर्यग्रहण काही राशींसाठी धन आणि यशाचे दरवाजे उघडू शकते, तर इतरांना तीव्र मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानीचा धोका आहे. तथापि या तीन राशींच्या लोकांच्या जीवनातील संकटाचे सर्व समस्या दूर होणार आहेत आणि भाग्याची चाहूल लागणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत या तीन राशी…

मिथुन रास

हे ग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी एक मोठे आश्चर्य घेऊन येऊ शकते. तुमच्या जीवनात आर्थिक प्रगतीच्या प्रचंड संधी आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होण्याचे प्रबळ संकेत आहेत. तथापि, पैसा आल्यावरही एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे: आपल्या बोलण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवा, नाहीतर ही संधी हातातून निसटू शकते.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा खूप सकारात्मक काळ आहे. बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित असलेले एखादे काम अचानक पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. शिवाय निधीचे नवीन स्रोतही सहज उपलब्ध होतील. परिणामी तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

मीन रास

या सुर्यग्रहणाच्या काळात मीन राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळू शकते. कामातील बढती किंवा व्यवसायातील नफ्या व्यतिरिक्त म्हाला अशी काही चांगली बातमी देखील मिळू शकते जी तुमचे भविष्य बदलेल.

या राशींना देखील फायदा होऊ शकतो

जरी या तीन राशींसाठी भाग्याचे दरवाजे अजूनही उघडे असले तरी, वृषभ, वृश्चिक आणि कुंभ राशींसाठी ग्रहणाचे एकूण परिणाम संमिश्र असतील. त्यांना करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळतील आणि भाग्याच्या जोरावर ते आपल्या शत्रूंवर मात करू शकतील. तथापि त्यांना आपल्या आरोग्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या काळात अनावश्यक प्रवास टाळणे उचित ठरेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत
  • हॉटेलमध्ये भेटू, तू चांगली दिसतेस; ग्राम महसूल अधिकाऱ्याचे भयंकर कृत्य; डर्टी WhatsApp चॅट समोर
  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in