• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान, षडयंत्रामागे डोके कुणाचे? जय पवार काय निर्णय घेणार?

July 14, 2026 by admin Leave a Comment


Sunetra Pawar Jay Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षातील एका पदाधिकाऱ्याने नोटीस पाठवत त्यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचं म्हटलं आहे यावरून पक्षात सुरू असलेला अंतर्गत कलह समोर आलेला आहे. सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे याचा देखील शोध घेतला जाईल अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून घेण्यात आलेली आहे. सध्या या प्रकरणी पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर

यापूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार पार्थ पवार असा अंतर्गत कलह पाहायला मिळाला होता. याच कलहाची पुढची आवृत्ती तर ही नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात निवडणुक आयोगासोबत प्रफुल पटेल यांनी केलेला पत्र व्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते एवढीच माहिती लिहिण्यात आली होती तर सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते अशी माहिती लिहिण्यात आली होती.

नाराज बडे नेते हे थेट शरद पवार यांना भेटायला गेले होते. त्यांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी गोटात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती पवारांच्या कानावर टाकली होती. बड्या नेत्यांनी पक्षातील नवीन नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. तर शरद पवार यांनी पार्थ पवार, जय पवार यांना समजावून सांगावे असा आग्रह धरला होता. पण हा तुमच्या पक्षातील अंतर्गत विषय असल्याचे सांगत शरद पवारांनी त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याची गोटातील माहिती समोर आली होती.

षडयंत्र तरी कुणाचे?

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या संघर्षाला ४ महिने उलटले तरी अद्याप या दोघांच्या पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम अद्याप पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेला नाही. किंबहूना निवडणूक आयोगाला नव्याने पत्र व्यवहार केला आहे की नाही याबाबत देखील स्पष्टता देखील देण्यात आलेली नाही. त्यामुळेच सध्या अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपात वरिष्ठ पातळीवरील कोणत्या नेत्याचा सहभाग आहे का याचा शोध राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने घेण्यात येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जय पवार काय निर्णय घेणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षाचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून नोटीस पाठवली आहे. या कृत्यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे का याचा शोध पक्ष नेतृत्वाकडून घेण्यात येत असल्याचे समजते. सध्या या प्रकरणी पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in