• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

July 22, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सोहैल खान आणि सीमा सजदेह हे एकेकाळी इंडस्ट्रीतील पॉवर कपल होते. या दोघांनी 1998 मध्ये पळून लग्न केलं होतं. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर 2022 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही या दोघांमधील मैत्रीचं नातं कायम आहे. दोघंही नुकतेच ‘अलायन्स’ या शोमध्ये एकत्र सहभागी झाली आहेत. या शोमध्ये येताच सोहैलने घटस्फोटाची संपूर्ण जबाबदारी स्वत:ची असल्याची कबुली दिली. विभक्त झाल्यानंतरही दोघं ज्याप्रकारे एकमेकांशी आदरपूर्वक वागतात, ते पाहून चाहतेसुद्धा प्रभावित झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये सोहैल सीमासोबतच्या लव्ह-स्टोरीबद्दल बोलताना दिसला.

तू आणि सीमा एकमेकांना कसे भेटलात, असा प्रश्न अभिनेता कुशल टंडन सोहैलला विचारतो. त्यावर तो सांगतो, “दिल्लीत एका लग्नसोहळ्यादरम्यान आम्ही भेटलो होतो. कदाचित त्यावेळी तिच्या कुटुंबीयांना आमच्याबद्दल समजलं होतं आणि ते तिच्यावर खूप नाराज झाले होते. तिच्या आईवडिलांमुळे आम्हाला कोणत्याच प्रकारच्या नकारात्मकतेत पडायचं नव्हतं. त्यामुळे त्यानंतर चार महिने आम्ही एकमेकांशी बोलतसुद्धा नव्हतो.”

मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेव्हा दोघांची पुन्हा भेट झाली, तेव्हा त्यांच्या लव्ह-स्टोरीला वळण मिळालं. याविषयी सोहैलने पुढे सांगितलं, “एका सुंदर रात्री मी माझ्या मित्रांसोबत पार्टी करत होतो, तेव्हा ती तिथे आली. तेव्हाच आम्ही पुन्हा भेट झाली होती. तेव्हा सीमने खुलासा केला होता की तिचा दुसऱ्या व्यक्तीशी साखरपुडा झाला आहे. ते ऐकून मीसुद्धा तिच्यापासून लांबच राहू लागलो होतो. मी तिला न भेटण्याचाही सल्ला दिला होता. कारण तिचा साखरपुडा झाला होता आणि मला भेटल्याने लोकांमध्ये चर्चा झाली असती. पण तेव्हा सीमा खुश नव्हती.”

सोहैलने सांगितलं की यानंतर लगेचच सीमा तिचे कौटुंबिक मित्र चंकी पांडे आणि चिक्की पांडे यांच्या घरी गेली. त्यावेळी तिचे कुटुंबीय तिला शोधत होते. सोहैलनेच तिच्या कुटुंबीयांना सीमा कुठे आहे, त्याविषयी सांगितलं. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांची भेट झाली. तेव्हा सीमी तिच्या वडिलांची गळाभेट घेऊन रडू लागली होती. नंतर सीमाच्या वडिलांनी हिंदू विवाहपद्धतीनुसारच लग्न करण्याचा आग्रह धरून सर्वांनाच चकीत केलं. इतकंच नाही, तर सीमाच्या वडिलांनी सोहैलला लग्न करण्यापूर्वी कुटुंबीयांचा आशीर्वाद घेण्याचाही सल्ला दिला. त्यावेळी वडील सलीम खान यांची काय प्रतिक्रिया असेल, याची सोहैलला काहीच कल्पना नव्हती. मात्र दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने दोघांचं लग्न ठरलं.

कुशल टंडनने यावेळी सोहैलला विचारलं की लग्न करायला किती वेळ लागला? त्यावर सोहैल हसून म्हणाला, “एक आठवडा.” सोहैल खान आणि सीमा सजदेहने आधी आर्य समाज मंदिरात हिंदू पद्धतीने लग्न केलं, त्यानंतर निकाहनामा वाचला. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर 2022 मध्ये सोहैल आणि सीमा विभक्त झाले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख…
  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in