
कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन देशभरात उभारले. या आंदोलनाला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. थेट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे मोदी सरकारसाठी मोठा झटका होता. फक्त जंतर मंतवरपुरतेच हे आंदोलन मर्यादित राहिले नाही तर तरूण विविध शहरांमध्ये रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. अभिजीत दिपके यांनी अमेरिकेत असतानाच कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आणि मोठे आंदोलन उभारले. कॉकरोच जनता पार्टी सरकारला धारेवर धरताना दिसत आहे. पहिल्याच आंदोलनात त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यात यश मिळाले. राजकारणाला सध्याच सुरूवात करणार नसल्याचे अभिजीत दिपके यांनी जाहीर केले.
आता कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते साैरभ दास यांनी म्हटले की, मेटा वारंवार इन्स्टाग्रामवरील त्यांच्या पोस्ट्स ब्लॉक करत आहे. यावरून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीका केली. साैरभ दास यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, त्यांच्या सोशल मीडिया खात्याला टार्गेट केले जात आहे. नय्यर गितेश नावाच्या एका व्यक्तीने अक्षत त्रिपाठी यांचा समावेश असलेल्या त्यांच्या एका व्हिडिओबाबत तक्रार केली होती.
अक्षत हा 20 वर्षांचा विद्यार्थी असून ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने त्याच्यासाठी 5 लाख रुपयांचा जामीन बंधपत्र जारी केला होता. मेटा सोशल मीडिया कंपनीबाबत अनेक प्रश्न आहेत. अकाऊंट बंद करून पुन्हा सुरू केली जात आहेत. सोशल मीडियावर टार्गेट केले जात आहे. मेटा काहीही न तपासता कारवाई करतंय का असेही त्यांनी म्हटले. मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Meta continues to block my posts on @instagram. Some Nayyar Gitesh reported my video with Akshat Tripathi, the 20 year old student who was issued a 5 Lakh bail bond by Greater Noida authorities.
Does @Meta have no checks? This is leading to my account having restricted reach. I… pic.twitter.com/MM7H8SB9mp
— Saurav Das (@SauravDassss) September 12, 2026
सौरव दास यांनी सोशल मीडिया कंपन्यांना सरकारच्या दबावाखाली न येण्याचे आवाहन केले. यासोबत त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटचा स्क्रीनशॉर्टही शेअर केला. कॉपीराइटचे उल्लंघन झाल्याचे त्यात दिसतंय. 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली संबंधित सामग्री ब्लॉक करण्यात आली आहे. सौरव दास यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Leave a Reply