• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Milk Preservation: दूध लगेच होतंय खराब, ‘या’ चुका करणं आजच टाळा…

September 12, 2026 by admin Leave a Comment


Milk Preservation: अनेकांची एकच तक्रार असती दूध उकळ्यानंतर देखील लगेच खराब होतं. आपल्याकडून नकळत अशा काही चुका होत असतात, ज्यामुळे दूध लगेच खराब होतं. सांगायचं झालं तर, दूध आपल्या दैनंदिन जीवनात फार मोठी भूमिका बजावतो. दूध आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतो. दूध उकळल्याने जरी जंतू मरतात, तरी ते योग्य प्रकारे साठवलं नाही तर जिवाणूंची पुन्हा वेगाने वाढ होऊ शकते. उकळलेलं दूध जास्त वेळ उघड्या हवेत किंवा स्टोव्हजवळ ठेवू नये. दुधाचे दूषितीकरण टाळण्यासाठी स्वच्छ, झाकण असलेली भांडी वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दूध वारंवार पुन्हा गरम करू नये, तर गरजेनुसारच ते बाहेर काढून वेगळं गरम करून वापरावं, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. दुधाला आंबट वास येत असल्यास किंवा त्याचा रंग बदललेला आढळल्यास, ते पुन्हा न उकळणं आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. एवढंच नाही तर, दूध, रोजच्या आहाराचा एक अविभाज्य भाग असून, ते शरीराला प्रथिने आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्वे पुरवतं.

बहुतेक घरांमध्ये, पॅकेटमधील दूध किंवा कच्चे दूध उकळून वापरण्याची प्रथा आहे. मात्र, अन्न सुरक्षा तज्ज्ञ असा इशारा देतात की, केवळ दूध उकळल्याने ते पूर्णपणे टिकत नाही आणि त्याची योग्य प्रकारे साठवणूक व हाताळणी करणे देखील महत्त्वाचे आहे.

दूध उकळल्याने त्यातील जंतू नष्ट होत असले तरी, गॅसवरून उतरवल्यानंतर आपण वापरत असलेल्या भांड्यातून, चमच्यातून आणि सभोवतालच्या हवेतून ते जंतू पुन्हा पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे, दूध खोलीच्या तापमानात किंवा गॅसजवळ जास्त वेळ उघडे ठेवणे टाळावे. भांडे घट्ट बंद करावे आणि दूध मध्यम गरम झाल्यावर ते त्वरित रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे.

दूधाचे आरोग्यास होणारे फायदे

दूध हे शरीरासाठी आवश्यक अनेक पोषक घटक देणारं अन्न आहे. त्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन B12 आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे दूध हाडे व दात मजबूत ठेवण्यास, स्नायूंची वाढ व दुरुस्ती करण्यास आणि शरीराच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक पोषण मिळवून देण्यास मदत करते. फोर्टिफाइड दुधातून व्हिटॅमिन D मिळू शकते, जे कॅल्शियमच्या शोषणासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आरोग्यास फायदेशीर ठरू शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange: आम्हाला मुंबईच्या वेशीवर सोडा अन… मनोज जरांगे पाटील यांचे कळकळीचे आवाहन
  • 4 दिवस, 4 रात्र, पाचव्या दिवशी थेट… मुंबईला कसं पोहोचणार? जरांगेंनी सांगितला मार्ग; आता आर या पार…
  • Milk Preservation: दूध लगेच होतंय खराब, ‘या’ चुका करणं आजच टाळा…
  • सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट… संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
  • Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन राजकारण करणार? अमृता फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर, काय म्हणाल्या?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in