• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सासऱ्याला संपवणाऱ्या कोट्याधीश सूनेच्या स्टोरीमध्ये नवीन टि्वस्ट, नोकरासोबत तिने..डिलिट केलेल्या 49 मेसेजेमध्ये काय सिक्रेट आहे?

September 9, 2026 by admin Leave a Comment


कानपूरच्या विनीत मिनोचा (63) हत्याकांड प्रकरणात नवीन टि्वस्ट आला आहे. कल्याणपुर येथील इंदिरानगर रतन ऑर्बिट अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री उशिरा विनीत मिनोचा यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी विनीत मिनोचा यांच्यावर चाकूने तब्बल 26 वार केले. ही घटना घडली त्यावेळी विनीत मिनोचा घरात एकटे होते. रविवारी सकाळी चार वाजता मुलगा आणि सून पार्टीवरुन घरी आले, त्यावेळी या घटनेबद्दल समजलं. या हत्याकांडाच्या तपासात ही हत्या सूनेनेच घडवून आणल्याचं समोर आलं आहे. या कोट्याधीशाची सूनच या हत्याकांडाची मास्टरमाइंड आहे. विनीत मिनोचा हे मोठे औषध व्यापारी आहेत. त्यांचा बिझनेस आहे. तिनेच सासऱ्याचा काटा काढला. हे सगळं पैशांसाठी झाल्याचीही शक्यता आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सूनबाई शालूने घरातील नोकराच्या मदतीने ही हत्या केली. शालू आणि कथित सुपारी किलर विशाल गौतम यांच्यात झालेल्या चर्चेचे 49 मेसेज डिलिट करण्यात आले आहेत. पोलीस आता हे मेसेजेस रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकचं नाही, तर दोघांमध्ये 1 मे पासून हत्येच्या दिवसापर्यंत तब्बल 309 वेळा कॉन्टॅक्ट झाला. या दोघांमध्ये इतकी चर्चा, बोलणं का व्हायचं? ही चौकशी टीमसमोर मुख्य प्रश्न आहे. त्यातले 49 मेसेज डिलिट करण्यात आले आहेत. त्यात काय मजकूर होता? हे प्रश्न आहेत.

मोबाइल चॅट डिलिट केले म्हणून सगळं संपत नाही

त्या 49 मेसेजेसमध्ये असं काय दडलय? हा पोलिसांना पडलेला प्रश्न आहे. शालू आणि विशालमधला डिजिटल रेकॉर्ड शोधला जात आहे. डिलिट केलेले अनेक संदेश सापडले आहेत. आता पोलीस टेक्निकल एक्सपर्टच्या मदतीने ते मेसेज पुन्हा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मोबाइल चॅट डिलिट केले म्हणून सगळं संपत नाही. अनेक प्रकरणात डिजिटल फॉरेन्सिकच्या माध्यमातून असे मेसेज रिकवर केले जातात. या प्रकरणात पोलिसांना हीच अपेक्षा आहे. डिलिट केलेले चॅट सापडले, तर पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात.

हत्येनंतर दोघांमध्ये काही बोलणं झालं की नाही?

हत्येबद्दल पहिल्यांदा बोलणं कधी झालं? दोघांमध्ये काय चर्चा झाली? कधी अचानक संपर्क वाढला? हत्याकांडाआधी काही निर्देश दिले होते का? हत्येनंतर दोघांमध्ये काही बोलणं झालं की नाही? पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, या प्रश्नांची उत्तरं तपासाची दिशा बदलू शकतात. 1 मे पासून हत्येच्या दिवसापर्यंत शालू आणि विशालमध्ये तब्बल 309 वेळा संपर्क झाला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
  • 61 वर्षांपूर्वीचं गाणं, जे ऐकताच लहान मुलं लगेच झोपी जातात, आजही हे गाणं महिला..
  • LPG Cylinder: एलपीजी सिलिंडर 400 रुपयांनी कमी होणार, तर सब्सिडी वाढणार? Report समोर
  • नागोठाणे उड्डाणपुलाच्या सिमेंटच्या प्लेट्सवर काचेच्या पट्ट्या; व्हिडीओ व्हायरल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
  • जरांगेंची शिंदेंवर एकेरी भाषा, शिवसेनेचे मंत्री देसाई भडकले, थेट म्हटले, आम्ही..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in