• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सावधान! तुम्ही पित असलेली दारू ‘खरी’ की ‘बनावट’? अशी ओळखा!

August 31, 2026 by admin Leave a Comment


राज्यात अन्नपदार्थात होत असलेल्या भेसळीवर धडक कारवाई सुरू आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात कारवाईचा धडाका सुरू आहे. सध्याचं धाडसत्र पाहता भेसळखोरांनी भेसळ करण्यासाठी एकही पदार्थ सोडलेला नाही असं दिसत आहे. असं असताना बनावट दारूबाबतही तक्रारी समोर येत आहे. या बाबतचा किस्सा खुद्द एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता. अन्न भेसळीविरुद्ध तक्रार निवारणासाठी राज्यभरातून फोन येत असतात. त्यात रात्रीच्या वेळी काही तळीरामांनी कर्मचाऱ्यांना फोन करून भंडावून सोडल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. दारू चढतच नाही असं त्यांनी या तक्रारीतून सांगितलं होतं. हा किस्सा त्यांनी सांगितला असला तरी बनावट दारू एक मोठी समस्या असल्याचं समोर आलं आहे. त्यात असुरक्षित पदार्थ किंवा जीवाला धोका निर्माण होणारे घटक असण्याची शक्यता आहे. काही जीवघेणी रसायने मिसळून दारू तयार केली जात असल्याची शक्यताही आहे. अशा स्थितीत बनावट आणि खऱ्या दारूतील फरक ओळखणं महत्त्वाचं आहे.

अशी ओळखाल दारू बनावट आहे की नाही ते…

दारूच्या बाटल्यांवर उत्पादन शुक्लचा क्यूआर कोड किंवा बारकोड असतो. यातून एमआरपी, डिस्टिलरी आणि स्टॉकची माहिती मिळते. सरकारी अप्लिकेशनद्वारे स्कॅन करा. जर कोड काम करत नसेल किंवा त्यावर लिहिलेली माहिती बाटलीशी जुळत नसेल तर ती बनावट असण्याची शक्यता आहे.

सीलबंद बाटली हातात घेतल्यानंतर एकदा ती हलवा आणि त्या बाटलीत येणाऱ्या बुडबुड्यांचे निरीक्षण करा. खऱ्या दारूत लहान बुडबुडे तयार होतात आणि लगेच नाहिसे होतात. जास्त फेस येत असेल आणि गढूळपणा असेल तर त्यात भेसळ असेल हे लक्षात ठेवा.

दारूची बाटली प्रकाशात धरा आणि त्याचं निरीक्षण करा. वाईन साधरणत: नितळ आणि पारदर्शक दिसली पाहीजे. तळाशी जाड गाळ असेल किंवा तरंगणारे कण असतील तर ती दारू बनावट असू शकते.

दारूच्या बाटलींचं झाकणावरूनही तुम्हाला त्यात काही भेसळ केली आहे की नाही याचा अंदाज येतो. झाकण घट्ट आणि व्यवस्थित आहे की नाही ते तपासावं. जर सैल असेल किंवा त्याचा सील तुटलेला असेल, तसेच काही छेडछाड केली असेल तर ती बाटली उघडून भेसळ केली असण्याची शक्यता आहे.

उत्पादक बाटलीवर छपाई करताना उच्च गुणवत्तेची काळजी घेतात. त्यामुळे नामसाधर्म्य आणि जाणीवपूर्वक स्पेलिंग चुकवून दिशाभूल केली जाते. चुकीचे लेबल किंवा विचित्र फॉन्ट ही बनावट दारूची निशाणी आहे हे लक्षात ठेवा.

वाईन शॉपमधून दारू घेताना त्याच ब्रँडच्या आणि आकाराच्या दुसऱ्या बाटलीशी तुलना करा. द्रव्याची पातळी एकदा तपासून घ्या. जराही खाली वर असेल किंवा त्यात मापात काही फरक असल्यास बाटली उघडल्याचं दिसून येते. त्यात भेसळ केली गेल्याचं समजून येतं.

महागडी दारू अत्यंत कमी किमतीत मिळत असेल तर संशयास वाव आहे. कारण बनावट दारू तयार करणारी टोळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किंमतीत विकतात. त्यामुळे असं काही असेल तर बनावट दारू असल्याचा संशय आहे.

दारूची बाटली उघडल्यानंतर पेंट थिनर, नेलपॉलिस रिमुव्हर किंवा तीव्र रसायनाचा विचित्र वास आला तर समजून जा त्यात भेसळ आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इंटरनेट नसलं तरी करता येणार UPI पेमेंट, फोन पे घेऊन आले भन्नाट फिचर; 20 कोटी लोकांना मोठी खुशखबर!
  • एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्… आदिती तटकरेंच्या मृत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
  • Indus Water Treaty : भारताने ताकद दाखवली, सिंधू जल करारावर वर्ल्ड बँकेच्या निर्णयाला दाखवली केराची टोपली, पाकिस्तानला दिला झटका
  • पाकिस्तान संघ आहे की नाटक कंपनी..! इमाम उल हकचा ड्रामा पाहून स्टूअर्ट ब्रॉडचा संताप, म्हणाला..
  • अंबानींनाही टक्कर देतंय मुंबईतील एक कुटुंब, जमीन एवढी की अँटालियाही काहीच नाही… या उद्योजकाचं तुमच्याशीही खास कनेक्शन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in