
राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील मंत्री आदिती तटकरे यांच्या पीआरओच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अयोध्या पौळ यांनी केला आहे.
त्यांच्या मते, मृत पीआरओ महिन्याला कोट्यवधी रुपयांची, म्हणजेच सुमारे दोन ते अडीच कोटींची उलाढाल करत असल्याची माहिती समोर येत आहे. पौळ यांनी या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पीआरओ मध्यरात्री शतपावली करत होता हे पटण्यासारखे नाही, तसेच तो पडलेला खूप उशिराने दिसला, यावर त्यांनी शंका व्यक्त केली. पीआरओ मुंबईत कोणासोबत राहत होता आणि त्याचे अलीकडचे वाढलेले ऊठबस व उंचावलेले राहणीमान यावरही चर्चा होत आहे. या सर्व चर्चांमुळे प्रकरणातील गुंतागुंत वाढली असून, म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर यावे, अशी त्यांची मागणी आहे.
Leave a Reply