• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सावधान! अतिमुसळधार पावसाचे दिवस, तब्बल इतक्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, थेट..

July 1, 2026 by admin Leave a Comment


पाऊस राज्यात सर्वदूर कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. कोकणासह अन्य भागात पावसाने धुमाकूळ घातला. मुंबईत कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पाऊस कोसळत होता. सकाळीही पाऊस सुरूच आहे. सिंधुदुर्ध जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पेरण्यांना आधार मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पेरण्या रखडल्या आहेत. आता शेतकऱ्यांची पेरण्याची तयारी सुरू झाली. अजूनही राज्याच्या काही भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. चांगल्या पावसाची शेतकरी वाट पाहात आहेत. आजही भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा मोठा अलर्ट जारी केला. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुढील 8 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. आज 1 जुलैपासून पाऊस अधिक कोसळण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मॉन्सून दाखल झाला. आता जुलै महिन्यात पावसाचा जोर अधिक असेल. 1 जुलै म्हणजेच आजपासूनच पाऊस अधिक कोसळेल, असा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे, डोबिंवली, कल्याण या भागात पावसाने दमदार हजेरी लावली. जुलै महिन्यात पाऊस काळ अधिक असेल. 29 जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.

पुढील 8 दिवसा दमदार पाऊस राज्यात होईल. ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सकल भागात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याची घटना समोर आली. उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी, गोरेगावसह सर्व भागात संध्याकाळपासून पाऊस सुरू आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.

पावसामुळे गावाच्या शेजारील असलेल्या ओढ्याला पूर, पुराच्या पाण्यात 65 वर्षीय शेतकरी महिला वाहून गेल्याची माहिती मिळतंय.  मंगलबाई शेषराव खंडागळे असे पुरात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे. गावकऱ्यांकडून वाहून गेलेल्या महिलेचा शोध सुरू केला. शेतकरी महिला शेतातून गावाकडे येत असताना ही घटना घडली. परभणीत पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागात पाणी देखील साचले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मला माफ करा, मी चुकलो..; अखेर आमिर खानच्या भावाकडून पश्चात्ताप व्यक्त, नेमकं काय घडलं?
  • पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर, सीमेवर प्रचंड तणाव, पाकिस्तान लष्कराच्या हवाई..
  • Petrol Diesel Price: सर्वसामन्यांसाठी मोठी बातमी, जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिळाला मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर घसरले
  • राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18…
  • Maharashtra News LIVE : सचिन आहिर यांच्या उमेदवारीनंतर शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in