• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

साप, खेकडे आणि… 75 वर्षीय आजी अंधाऱ्या विहिरीत पडली, दोन दिवस मृत्यूशी संघर्ष, त्यानंतर जे घडलं…

September 1, 2026 by admin Leave a Comment


नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एका वृद्ध महिलेने मृत्यूशी दिलेल्या झुंजीने सर्वांना थक्क केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ७५ वर्षीय चंद्रभागा धुळाजी व्हरकटे यांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले. २९ ऑगस्टपासून हरवल्या असलेल्या आजी बसस्थानकाजवळील उघड्या विहिरीत पडल्या होत्या. पूर्ण दोन दिवस अन्न-पाण्याशिवाय काळोख्या विहिरीत अडकूनही त्यांनी जीव वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा आजी २९ ऑगस्ट रोजी मुलाकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर निघाल्या होत्या. त्यानंतर मात्र त्या घरी परत आल्या नाहीत. कुटुंबीय शोध घेत असतानाच त्या बसस्थानकाजवळील उघड्या विहिरीत पडल्याचे समोर आले.

काळ आला पण वेळ आली नव्हती

विहिरीत पडल्यानंतर आजींनी धीर सोडला नाही. त्यांनी मोटारीच्या पाईपला आणि दोरीला घट्ट धरून ठेवले. विहिरीत असलेले साप, किडे, खेकडे यांनाही आजी घाबरल्या नाहीत. अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस उपाशी-तहानलेली राहूनही त्यांनी आपली पकड कायम ठेवत जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. या संघर्षात त्यांनी अपार धैर्य दाखवले. दरम्यान, स्थानिक युवक गणेश पारवे यांच्या नजरेस विहिरीतील दृश्य पडले. त्यांनी तात्काळ इतर नागरिकांना कळवल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक युवक, चांदवड पोलीस आणि नगरपरिषदेचे पथक घटनास्थळी पोहोचले.

आजींना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू झाले. स्थानिक युवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून प्रयत्न केले. अखेर खाटेच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दोन दिवसांच्या झुंजीनंतर आजींची सुटका होताच परिसरातील लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. चंद्रभागा आजींना तातडीने पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यापूर्वीही अशी घटना घडली

आजी नेमक्या कशा पडल्या याचा तपास आता चांदवड पोलीस करत आहेत. या उघड्या विहिरीत यापूर्वीही अपघात झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने विहिरीभोवती सुरक्षा जाळी आणि संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोरदारपणे करण्यात येत आहे. दोन दिवस मृत्यूशी झुंज देत अडकून राहिलेल्या ७५ वर्षीय चंद्रभागा आजींच्या धैर्याने आणि स्थानिक युवकांच्या तत्परतेने अखेर त्यांना जीवनदान मिळाले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
  • खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in