• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सापापेक्षा महाभयंकर हे 5 कीडे, माणूस सापडतो संकटात; कसा बचाव करावा?

July 19, 2026 by admin Leave a Comment


ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा यांची तब्ब्येत अचानक बिघडल्याने त्यांना कोलकात्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी विषारी कीटकाने चावा घेतल्याचे त्यांची तब्ब्येत बिघडली असल्याचे समोर आले आहे. राजेश शर्मा यांना तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास आणि पायामध्ये संसर्गाची लक्षणे दिसत आहेत, सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आज आपण अशा काही कीटकांची माहिती जाणून घेणार आहोत, जे सापापेक्षा खतरनाक आहेत. जे चावल्या तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो.

एशियन जायंट हॉर्नेट (गांधीलमाशी)

हा जगातील सर्वात मोठ्या हॉर्नेट्सपैकी एक आहे. याने चावा घेतल्यास ते अत्यंत वेदनादायक असतो. या कीटकाच्या विषामुळे शरीरात तीव्र सूज, असह्य वेदना आणि काही वेळा मूत्रपिंडाचेही नुकसान होऊ शकते. अनेक दंश झाले किंवा संबंधित व्यक्तीला अॅलर्जी असल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. या कीटकापासून बचाव करण्यासाठी हॉर्नेटच्या पोळ्याजवळ जाऊ नका. चुकून दंश झाला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरित रुग्णालयात जा.

डास

डास हा जगभरात सर्वाधिक मानवी मृत्यूंसाठी जबाबदार आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, झिका आणि यलो फीव्हरसारखे गंभीर आजार डासांमुळे पसरतात. यापासून बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका. मच्छरदाणी आणि डासप्रतिबंधक (रिपेलंट) वापरा. पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करा.

बुलेट मुंगी

सामान्य मुंगी चावल्यास थोड्या वेळासाठी वेदना किंवा त्वचा लाल होते. मात्र बुलेट मुंगीचा दंश जगातील सर्वाधिक वेदनादायक कीटकदंशांपैकी एक मानला जातो. त्याच्या दंशाची वेदना अनेक तास टिकू शकते. साधारणतः हा दंश जीवघेणा नसतो, परंतु गंभीर अॅलर्जी असलेल्या व्यक्तींमध्ये धोका वाढू शकतो. अशा मुंग्यांपासून बचाव करण्यासाठी मोठ्या मुंग्यांच्या वारुळांपासून दूर राहा.

आफ्रिकनाइज्ड हनी बी

या किड्याला किलर बी असेही म्हटले जाते. या मधमाशा सामान्य मधमाशांपेक्षा अधिक आक्रमक असतात. मोठ्या संख्येने हल्ला केल्यास शेकडो दंश होऊ शकतात, ज्यामुळे गंभीर अॅलर्जी किंवा अवयवांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा मधमाशांच्या पोळ्यांपासून दूर राहा.

रेड इम्पोर्टेड फायर अँट

ही मुंगी अत्यंत धोकादायक मानली जाते. तिच्या दंशामुळे तीव्र जळजळ, फोड आणि काही लोकांमध्ये गंभीर अॅलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकते. वेळेत उपचार न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. अशा मुंग्यांपासून दूर रहा.

कीटक चावल्यास काय करावे?

चावलेली जागा साबण आणि स्वच्छ पाण्याने धुवा. सूज आणि वेदना कमी करण्यासाठी थंड पाण्याची पट्टी किंवा बर्फाचा शेक द्या. ताप, श्वास घेण्यास त्रास, संपूर्ण शरीरावर सूज, चक्कर येणे, बेशुद्ध होणे किंवा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यास त्वरित रुग्णालयात जा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अँटिबायोटिक किंवा इतर कोणतेही औषध स्वतःहून घेऊ नका.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळ दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती, नागरिकांना काय केलं आवाहन?
  • मी तुला दोन बॅट देईन…! सरफराज खानने पाचव्या दिवशी केशाराला दिली विचित्र ऑफर, पण का?
  • ८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका ? डॉक्टरांनी सांगितले…
  • Shweta Tiwari : आधी संताप, आता म्हणाली थँक्यू… श्वेता तिवारीने राज ठाकरेंचे मानले आभार; काय घडलं नेमकं?
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठणार का? कर्णधार गिलने एका वाक्यात सांगून टाकलं की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in