
आजकल आपली जीवनशैली अशी झाली आहे की बहुतांशी वेळ संगणकासमोर किंवा लॅपटॉपवर खुर्चीवर बसुन निघतो. ऑफीसात अनेक तास एकाच जागी बसून काम केल्याने अनेक शारीरिक व्याधी जडत आहेत. अनेक जण तर ८ ते १० तास बसून काम करतात. चेन्नईचे कंसलटन्ट कार्डिओलॉजिस्ट डॉ. संजीव व्ही.के. यांच्या मते सतत बसून काम केल्याने कंबर, पाठ आणि मानेवरच नाही तर तुमच्या हृदयावर देखील परिणाम होतो आहे.
दीर्घकाळ बैठे काम केल्याने हृदयावर काय परिणाम ? – जेव्हा तुम्ही दीर्घकाळ एकाच जागी बसून काम करत असता, तेव्हा तुमच्या मसल्स जास्त काम करत नाहीत. याचा अर्थ शरीरातील रक्तात असलेली साखर आणि फॅटचा योग्य प्रकारे वापर होत नाही. हळूहळू त्यामुळे ब्लड शुगर आणि ट्रायग्लिसराईड वाढू शकते. आणि गुड कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. याचा थेट परिणाम हृदयावर होते.
ब्लड फ्लो होऊ शकते स्लो – सतत एका जागी बसून काम केल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन स्लो होऊ शकते. खासकरुन पायात दीर्घकाळ रक्त जमा झाल्याने ब्लड क्लॉटचा खतरा वाढू शकतो.
डॉ. संजीव यांनी सांगितले की कमी वयामध्ये हाय ब्लडप्रेशर, वाढलेले कॉलेस्ट्रॉल आणि थकव्या सारख्या समस्या पाहायला मिळू शकतात. ३० आणि ४० वयाच्या लोकांमध्येही दीर्घकाळ बसून काम केल्यान अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
जर तुमचे काम बैठे आहे तर काय कराल ? – दर ३० मिनिटांनी उठा – सतत खुर्चीवर बसण्याऐवजी दर ३० मिनिटांत किमान ३० सेंकदासाठी उभे रहा. फोन कॉल आला तर बसून कॉल अटेंड करण्याऐवजी काही मिनिटे चालता चालता बोलू शकता.
जेवल्यानंतर ५ – १० मिनिटे चाला – लंच आणि डिनरनंतर थोडा वेळ वॉक करण्याची सवय घाला. त्यामुळे जिमला न जाता देखील तुम्ही फिट राहू शकता. घर वा ऑफीसात काही मिनिटे चालू शकता.
डेस्कवर जेवण करु नका : दर काही वेळा चहा, कॉफी आणि पॅकेज्ड स्नॅक्स खाण्याच्या ऐवजी जवळ पाणी ठेवा. भूक लागण्यानंतर थोडेसे नट्स वा अन्य हेल्दी स्नॅक्स घेऊ शकता.






Leave a Reply