• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सलमान खान याच्यावर का आली स्वतःचं घर सोडून जाण्याची वेळ! भाईजानबद्दल महत्त्वाची अपडेट समोर

June 27, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याला आता कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. कोणत्या न कोणत्या कारणामुळे सलमान आज चर्चेत असतो. आता देखील सलमानबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सलमान खान याने वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता नवीन घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, 2024 मध्ये झालेल्या गोळीबारानंतरच अभिनेत्याने हा मोठा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान आता स्वतःच्या जमिनीवर भव्य घर बांधणार आहे. अभिनेत्याला 6 मजल्यांच्या घराची परवानगी मिळाली आहे… सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचं काम पूर्ण झाल्यानंतर, संपू्र्ण खान कुटुंब एकचा घरात राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील चिम्बई परिसरात सलमान खान स्वतःचा प्लॉट घेऊन सहा मजली समुद्रकिनारी घर बांधणार आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने 16 जूनला या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. नवीन इमारत ग्राऊंड फ्लोअर, स्टिल्ट पार्किंग आणि सहा मजली असेल. एकूण बांधकाम क्षेत्र 1हजार 14 चौरस मीटर असणार आहे. हा प्रकल्प सच डेव्हलपर्स बांधणार आहे. बीएमसीने ऑक्टोबर 2025 मध्ये प्रारंभिक परवानगी दिली होती.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे नवीन घर सलमान खानच्या आई सलमा खान यांच्या जमिनीवर बांधलं जाणार आहे. या प्लॉटवर 1956 पूर्वीचं दोन मजली जुनं घर होतं, जे कुटुंबाने खरेदी करून पाडलं होतं. एवढंच नाही तर, बांधकामादरम्यान एकही झाड तोडलं जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. उलट स्थानिक प्रजातींची नवीन झाडं देखील लावली जाणार आहेत.

सलमान खान याच्या घराबाहेर झालेला गोळीबार

2024 मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन बाईकस्वारांनी गोळीबार केला होता. तपासात त्यांचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचं समोर आलं. त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवून Y+ सुरक्षा देण्यात आली. ज्या बाल्कनीतून तो चाहत्यांना अभिवादन करायचा, ती बुलेटप्रूफ काचेने सुरक्षित करण्यात आली. मुख्य रस्त्यापासून दूर शांत गल्लीत असलेलं हे नवीन घर सलमान आणि त्याच्या कुटुंबाला अधिक सुरक्षा आणि प्रायव्हसी देईल. सलमान खान 1974 पासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे. मात्र, या संपूर्ण प्रकल्पावर सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in