• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सलमान खानने 3.5 कोटींना विकले वांद्र्यातील घर, इथे बांधणार नवा बंगला

July 30, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता सलमान खान त्याच्या घरामुळे चर्चेत आहे. सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून मुंबईच्या बांद्र्यात समुद्रकिनाऱ्याजवळ बांधलेल्या सहा मजली नवीन घरात शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण आता सलमानने त्याचे वांद्रे येथील घर विकले असल्याचे समोर आले आहे. सलमानने हे घर का विकले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान खानने वांद्रे वेस्टमधील एक अपार्टमेंट विकले आहे. हे अपार्टमेंट ३.५ कोटी रुपयांना विकले गेले आहे. सलमानने हे अपार्टमेंट २०१५ मध्ये २.८८ कोटी रुपयांना खरेदी केले होते. हे अपार्टमेंट वांद्रे वेस्टमधील एका निवासी इमारत ‘शिव-अस्थान हाइट्स’मध्ये आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन रेकॉर्ड्सनुसार, ही विक्री ९ जुलै, २०२६ रोजी नोंदवली गेली होती. खरेदीदारांनी २१ लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी आणि ३०,००० रुपये रजिस्ट्रेशन फी भरली आहे.

सलमान खानच्या या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया ७५८ स्क्वेअर फूट आहे आणि त्यासोबत दोन कार पार्किंगची जागाही आहे. व्यवहाराच्या किंमतीनुसार, ही डील कार्पेट एरियाच्या हिशोबाने सुमारे ४६,००० रुपये प्रति स्क्वेअर फूट बसते.

सलमानला झाला फक्त ६२ लाख रुपयांचा फायदा

डॉक्युमेंट्सनुसार, सलमान खान आणि खरेदीदारांनी नंतर २३ जुलै, २०२६ रोजी ट्रान्सफर डीडवर सही केली, ज्यामुळे मालकीहक्काचे कायदेशीर हस्तांतरण पूर्ण झाले. हे अपार्टमेंट विकून सलमानला ६२ लाख रुपयांचा नफा झाला आहे.

ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा सलमानने या भागातील प्रॉपर्टी विकली आहे. याआधीही त्याने जुलै २०२५ मध्ये याच बिल्डिंग ‘शिव-अस्थान हाइट्स’मधील आणखी एक अपार्टमेंट ५.३५ कोटी रुपयांना विकले होते. सध्या सलमान गॅलक्सी अपार्टमेंट्समध्ये राहत आहे. इथेच त्याचे बालपण गेले आहे. याच अपार्टमेंटमध्ये त्याचे आई-वडीलही राहतात.

सलमान आता समुद्रकिनाऱ्याजवळ बांधणार आलिशान बंगला

सलमान आणि त्याचे कुटुंब आता मुंबईच्या वांद्र्यात एक सहा मजली निवासी टॉवर बांधण्याची योजना आखत आहेत. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून मंजुरी मिळाली आहे. हा टॉवर समुद्रकिनाऱ्याजवळ बांधला जाणार आणि गॅलक्सी अपार्टमेंटपासून थोड्याच अंतरावर असेल. सलमानचा हा टॉवर ६ मजली असेल. या टॉवरसाठीच सलमानने ही प्रॉपर्टी विकली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in