• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सलमान खानने जे केले ते बॉलिवूडमधील एकही कलाकार करूच शकत नाही, भाईजानचा मोठा निर्णय, थेट 500 घरे..

August 7, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा एक व्हिडीओ मध्यंतरी तूफान व्हायरल होताना दिसला. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. सलमान खान याचा थकलेला चेहरा, प्रचंड कमी झालेले वजन पाहून सर्वजण हैराण झाले. सलमान खान आजारी असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. अखेर सलमान खान याने कमी झालेल्या वजनाचे कारणही सांगून टाकले. इतके वजन नक्की का कमी झाले, हे त्याने स्पष्ट केले. सलमान खान याला जिंदा दिलही म्हटले जाते. कोणालाही काहीही मदत लागली की, सलमान खान कोणताही विचार न करता मदतीला धावतो. प्रत्येकाला मदत करतो. सलमान खान मोठ्या संपत्तीचा मालक असून अत्यंत लग्झरी गाड्या सलमान खानकडे आहेत. पनवेलला एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षाही भारी फार्महाऊस सलमान खानकडे आहे.

आता नुकताच सलमान खान याने मोठा निर्णय घेतला. ज्यानंतर सलमान खान याचे जोरदार काैतुक होतंय. आसाममध्ये पावसाने कहर केला. हजारो घरे वाहून गेली. अनेक कुटुंबिय बेघर झाली. यादरम्यान अनेक संस्था आणि स्वयंसेवक मदतीला पुढे आले. एका रिपोर्टनुसार, पूरग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी 500 अर्ध-कायमस्वरूपी घरे बांधण्याचा निर्णय सलमान खानने घेतला आहे.

या उपक्रमासाठी सलमान खानच्या बीइंग ह्युमन या संस्थेने ग्लोबल शीख्स या स्वयंसेवी संस्थेशी भागीदारी केली.  मदतकार्याच्या पहिल्या टप्प्यात गरजूंपर्यंत अन्न आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यावर भर देण्यात आला. आता या बेघर कुटुंबियांना सुरक्षित निवारा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आसामच्या नेपाली खुटी या गावात 220 अर्ध कायमस्वरूपी घरे उभारण्यात आलीत.

याच गावात पुरामुळे मोठे नुकसान झाले. बांबू आणि पत्रे वापर करून ही घरे बांधली जात आहेत. प्रत्येक घराच्या बांधकामाचा खर्च अंदाजे 35,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान खान याने पुन्हा एकदा आपल्या मनाचा मोठेपणा दाखवल्याचे बघायला मिळतंय, सलमान खान याच्या संस्थेकडून या पुरग्रस्तांना भरभरून मदत केली जातंय. आसाम राज्यात पावसाने हाहाकार घातला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष
  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…
  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in