• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्वात मोठी बातमी ! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा मृत्यू; कुणी केला मोठा दावा?

August 12, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार वजाहत एस. खान यांनी हा सर्वात मोठा दावा केला आहे. पाकिस्तानी सेना आणि सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करत असल्याचं वजाहत खान यांनी म्हटलं आहे. इमरान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याने कुणालाच त्यांना भेटू देत नसल्यांचा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. वजाहत खान यांच्या दाव्याने पाकिस्तानातच नव्हे तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

ज्येष्ठ पत्रकार वजाहत एस खान यांनी इमरान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याचा दावा केला असला तरी पाकिस्तान सरकारकडून अद्याप या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही. इमरान खान यांच्यावर अनेक केसेस सुरू आहेत. 2023 पासून ते पाकिस्तानच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत.

तुरुंगात भेटू दिलं जात नाही

इमरान खान तुरुंगात असून त्यांना कुणालाही भेटू दिलं जात नाही. इमरान खान यांची पार्टी तहरीक एक इन्साफ यांनीही वारंवार हा आरोप केला आहे. इमरान खान यांच्या बहिणीला किंवा कुटुंबीयांनाही त्यांना भेटू दिलं जात नाही. इमरान खान हे आजारी असल्याने त्यांच्या उपचाराबाबतचे हालहवालही विचारू दिले नसल्याचा पीटीआयचा दावा आहे. सध्या इमरान खान हे डोळ्यांच्या विकाराने त्रस्त आहेत.

 

BIG: Senior Pakistani Journalist Wajahat S Khan claims that his sources who are three Senior Officers in Pakistani Army have said that they fear Former Pakistan PM Imran Khan is dead inside prison and hence Pakistan Army Chief Asim Munir is hiding him from the entire country. pic.twitter.com/IDjeqFEh1s

— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) August 12, 2026

कोर्टाच्या बाहेर निदर्शने

मंगळवारी पीटीआयने कोर्टाच्या बाहेर निदर्शने केली होती. इमरान खान यांच्यावरील खटले निकाली काढण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली होती. मात्र, कोर्टाच्या रजिस्टारने या प्रकरणांची पुढच्या आठवड्यात सुनावणी करू, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर पीटीआयने निदर्शने मागे घेतली होती. खान यांच्यावरील प्रकरणाची लवकर सुनावणी करने आणि त्यांना आरोग्य सुविधा देणे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्याची मागणी या आंदोलकांनी केली होती.

आधीही अफवा उठली

दरम्यान, यापूर्वीही इमरान खान यांच्या मृत्यूची अफवा उठली होती. इमरान खान यांच्या कुटुंबीयांना त्यांना तुरुंगात भेटू दिलं जात नव्हतं. त्यामुळे ही अफवा उठली होती. त्यानंतर पुन्हा एकदा इमरान खान यांच्या मृत्यूची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर सरकारने अद्याप अधिकृत काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे इमरान खान यांच्या मृत्यूबाबतचं गूढ वाढलं आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in