• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार… एकनाथ शिंदेंचे कौतुक

June 22, 2026 by admin Leave a Comment


धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात ओमराजेंनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तसेच मी जो निर्णय घेत आहे तो सर्वांना मान्य असावा असंही त्यांनी म्हटलं आहे. ओमराजे निंबाळकरांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही क्लिप आजच्या कार्यकर्ता मेळाव्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. पण टीव्ही9 मराठी या क्लिप्सची पुष्टी करत नाही.

काय म्हणाले ओमराजे?

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत म्हटले की, आपल्याला लोकांची कामे करण्यासाठी निधी लागेल. आपल्याला सत्तेतील नेतृत्व स्वीकारावं लागेल. आपला निकाल आला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. निकाल लावण्यासाठी गेलो असं लोक म्हणतात. मग मी 22 तारखेलाच गेलो असतो ना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. साध्यासाध्या कार्यकर्त्यांच्या कामालाही अडचणी येत आहेत. मी काही निर्णय घेणार आहे. या निर्णयाच्या पाठिशी तुम्ही राहा.

आपल्याला सत्तेलतील नेतृत्व स्वीकारावं लागेल – ओमराजे

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ओमराजे म्हणत आहेत की, ‘आपल्याला सत्तेतील नेतृत्व स्वीकारवच लागेल. आपल्याला एकही नगरपालिका जिंकता आली नाही. सत्तेचा वापर करून त्यांचं काम करू आहे. आपल्याला लोकांची काम करण्यासाठी निधी लागेल. आपण निर्णय घेणं महत्वाचं आहे.’ अनेक कार्यकर्तांनी तुमची प्रतिमा मलिन होत आहे असं विधान केलं, यावर बोलताना ओमराजे म्हणत आहेत की, मी खासदार मी माझी प्रतिमा घडवायला आलो काय ? निकाल विरोधात लागल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलणं झाल आहे. माझ्या निर्णयाच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी रहायला पाहिजे. त्यांच्या मांडीला मांडी लावून नाही त्यांच्या उरावर बसण्यासाठी आलो आहे.

सत्तेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांनी केली होती मागणी

काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांनी सत्तेसोबत जावं असं म्हटलं होतं. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. ओमराजेंनी एकनाथ शिंदे गटात जावे असे आम्हाला वाटते. तसेच खासदार निंबाळकरांना मंत्रीपद मिळायला पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…
  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड
  • MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
  • ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in