• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्वांसमोर हिंदी बोलताना यशकडून झाली ही चूक; रकुलसह रवी दुबेलाही हसू अनावर

July 20, 2026 by admin Leave a Comment


नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर येत्या 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात चित्रपटातील मुख्य कलाकार उपस्थित होते. ‘केजीएफ’ स्टार यश यामध्ये रावणाच्या भूमिकेत आहे. ट्रेलर लाँच कार्यक्रमात त्याने हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्याकडून थोडीफार चूक झाली. यशच्या तोंडून चुकीचे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेल्या रकुल प्रीत सिंह आणि रवी दुबे यांना हसू अनावर झालं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रावणाच्या भूमिकेसाठी निवड केल्याबद्दल निर्माते नमित मल्होत्रा यांचे आभार मानताना यशने ‘अवसर’ या शब्दाऐवजी ‘अवकाश’ असा उल्लेख केला. जेव्हा यशला मंचावर बोलावण्यात आलं, तेव्हा तो म्हणाला, “इथे सर्वजण हिंदीत बोलत आहेत, मीसुद्धा प्रयत्न करेन. या चित्रपटाच्या टीमसोबत काम करताना मला माझी हिंदी सुधारण्याची संधी मिळाली.” याचदरम्यान पुढे त्याच्याकडून काही चुकीचे उच्चार होतात. तेव्हा रवी दुबे आणि रकुल एकमेकांकडे पाहून हसू लागतात. या चित्रपटात रकुल शूर्पणखेच्या भूमिकेत आहे.

पहा यशचा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Silent Detective (@silentdetective1)

“रामायणम् हा चित्रपट म्हणजे भारताचं स्वप्न आहे. आम्ही सर्वजण एक विचार आणि एका हेतूने एकत्र आलो आहोत. ही कथा आम्हाला जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे”, अशा शब्दांत यश व्यक्त झाला. यश हा कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. त्याचे ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. आता ‘रामायण’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपटसृष्टीत काम करतोय.

या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत आहे. अभिनेता सनी देओलची निवड हनुमानाच्या भूमिकेसाठी करण्यात आली असून रवी दुबे यामध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. तब्बल 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड
  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in