• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

समृद्धी महामार्गावर डोक्यात रॉड घालून पत्नीची हत्या, मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास फिरला, त्यानंतर..

July 14, 2026 by admin Leave a Comment


वाशिममध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवऱ्याने समृद्धी महामार्गावरच पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर तो अनेक तास महामार्गावर फिरत राहिला. त्यानंतर त्याने थेट पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना सर्व हकिकत सांगितली आणि स्वत: शरणागती पत्करली. या घटनेने वाशिम हादरून गेलं आहे. पोलिसांनी आरोपी सलमान खान नेक याला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

समृद्धी महामार्गावर पत्नीच्या हत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर (नोएडा) जिल्ह्यातील कलवर्धा गावातील 30 वर्षीय सलमान खान नेक मोहम्मद खान याने पत्नी हसीनबानो सलमान खान (वय 28) हिची हत्या केल्याप्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

प्रवासातच भांडण जुंपलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान हा पत्नी आणि तीन लहान मुलांसह कारने समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होता. समृद्धी महामार्गावर पती-पत्नीमध्ये वाद झाला. शब्दाला शब्द वाढत गेले. त्यामुळे सलमानचा संताप अनावर झाला. त्याने समृद्धी महामार्गावरच कार बाजूला लावली आणि लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर जोरदार वार केले. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. पण त्यावरही तो थांबला नाही. त्यानंतर त्याने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली. पोलीस ठाण्यात आल्यावर सलमानने स्वत: ही सर्व कबुली दिली आहे. तसेच पत्नीला ठार मारण्यामागचं कारणही सांगितलं आहे.

पहाटेच पोलीस ठाण्यात

घटनेनंतर आरोपी पत्नीचा मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास समृद्धी महामार्गावर फिरत राहिला. अखेर पहाटेच्या सुमारास तो स्वतः कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारमधून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी दिली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in