• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सध्या शिंदे, फडणवीस यांची गोची झालीये, आणि ते सांगतात.., नेमकं काय म्हणाले जरांगे?

August 9, 2026 by admin Leave a Comment


पुन्हा एकदा मराठा आरक्षाचा मुद्दा तापताना दिसत आहे, कुणबी प्रमाणपत्र सरकारकडून रद्द करण्यात येत आहेत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आज सोलापूरमध्ये बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला समाजाचे लेकरं महत्वाचे आहेत, एकही वायला जाऊ नये, म्हणून झुंज चालू आहे.  काहीही संबंध नसतांना समाजातील लेकरांना अडचणीत आणण्याचं षडयंत्र सुरु आहे. आम्ही कितीही चांगले वागलो तर आमच्या अन्नत विष कालण्याचे काम सुरु आहे, असा आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे. ते सोलापुरातील वाटंबरे गावात बोलत होते.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, इतकं भयंकर मोठं षडयंत्र रचल गेलं, कित्येक तरी कट आखले, शेवटचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे जरांगे पाटील आंदोलनापासून लांब गेले पाहिजे आणि मराठा समजपासून तुटले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्या माध्यमातून डाव टाकण्याचा प्रयत्न केला, 4 प्रमाणपत्र रद्द केले. शेवटचा प्लॅन बावनकुळे यांच्या हाताने रचला गेला, असा आरोपही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून संजय सिरसाठ यांनी प्रमाणपत्र रद्द केले,  दोन दिवस मीडिया ट्रायल झाली, माझ्या लक्षात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी फक्त तिकीट दिलं, मात्र निवडून आम्ही आणलं. त्यांचेच काही लोकं आम्हाला गुपचित सांगतात की देवेंद्र फडणवीस यांनीच मीडिया ट्रायल घ्यायला सांगितले. मला बीडच्या अधिकाऱ्याने सांगितलं की बावनकुळे यांनी प्रमाण पत्र रद्द करण्यासाठी पत्र दिलं.  माझ्यावर नेते मंडळी खूप प्रेम करतात, मला अधिकारी सुद्धा सांगतात,  सध्या फडणवीस आणि शिंदे यांची गोची झाली आहे, आणि मीडियामध्ये ते  सांगतात की आम्ही जरांगेंचा गैरसमज दूर करू. यांना सातारा आणि कोल्हापूर संस्थानचं गॅझेट द्यायचं नाही, मी पक्क आरक्षण देतो हे त्यांना कळालं आहे, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पोस्ट ऑफिसमधील PPF, SSY आणि SCSS खाती बँकेत ट्रान्सफर करता येतात का? जाणून घ्या पोस्टाचा अधिकृत नियम
  • ऋषभ पंत विकेटकिपिंग का करत नाही? अखेर तो धक्कादायक फोटो समोर आलाच; काय घडलं?
  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in