
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनासोबत आढावा बैठक घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या वेगाने वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळत असून परिस्थिती गंभीर बनली आहे. रायगडमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरही पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. कशेडी घाटात तर संपूर्ण डोंगराचा भाग कोसळल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जुलै महिन्यात पडणाऱ्या सरासरी पावसापैकी मोठा पाऊस अवघ्या 4 दिवसांत झाला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे उद्या 300 मिमी पावसासह ढगफुटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील 4 नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये ढग फुटीची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे.
काल राज्यात तब्बल 350 झाडे पडली. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मानवता आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रोम होम करण्याचा पर्याय द्यावा.
Leave a Reply