• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सगळे काही खोटे आहे.. राजा रघुवंशी याच्या हत्येनंतर सोनम रघुवंशी हिचा मोठा दावा, थेट..

June 16, 2026 by admin Leave a Comment


मध्य प्रदेशच्या राजा रघुवंशी याच्या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली. त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच त्याला संपवलं, असा दावा आहे. प्रियकर कराज कुशवाहा याने आणि सोनमने राजा रघुवंशी याची हत्या केल्याचा आरोप आहे. हनीमूनला गेले असता त्याची हत्या करण्यात आली. या घटनेने देश हादरला होता. त्यानंतर सोनम प्रियकरासोबतच लपून बसली होती. पोलिसांनी अखेर मोठ्या प्रयत्नानंतर तिला अटक केले. कुटुंबियांनी सोनम आणि राजा यांचे लग्न धुमधडाक्यात लावून दिले. त्यावेळी कोणीही विचार केले नाही की, सोनमच्या मनात इतका भयंकर प्लॅन आहे. आता राजा रघुवंशी प्रकरणात जामिनावर सोनम बाहेर आली. एकीकडे सोनमच्या कुटुंबियांकडून दावा केला जातो की, सोनम सूर्यवंशी हिच्यासोबत आम्ही सर्व नाते तोडले आहे तर दुसरीकडे तिचे वडील कोर्टाबाहेर तिच्यासोबत दिसतात.

यादरम्यानच सर्व आरोपांमध्ये सोनम रघुवंशी ही माध्यमांपुढे आली. सोनम रघुवंशी हिने धक्कादायक खुलासे केले. सोनम रघुवंशी हिने म्हटले की, सर्वकाही खोटे आहे. माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. प्लीज त्याकडे लक्ष देऊ नका. मी आता या केसबद्दल जास्त काही बोलू शकत नाही. कारण कोर्टात केस सुरू आहे. सोनम जेलमधून बाहेर आली असली तरीही तिला शिलॉन्गच्या बाहेर जाण्याची परवानगी कोर्टाने नाकारली आहे. सोनम हिने पुढे म्हटले की, मी कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करते आणि पुढेही करत राहिल.

मे 2025 मध्ये मध्य प्रदेशचा व्यावसायिक राजा रघुवंशी याची हत्या करण्यात आली. त्यानुसार,राजा रघुवंशी याची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच हा हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. लग्नानंतर 8 दिवसांनी दोघे हनीमूनला गेले होते. तिथेच राजाची हत्या करण्यात आली. सोनम हिने म्हटले की, मी शिलॉन्गच्या बाहेर कुठेही जाणार नाही. मी सुरक्षेच्या कारणामुळे इथेच आहे. तिने हे देखील सांगितले की, ती स्वत:चा खर्च स्वत: उचलत आहे. कोणीच माझी मदत करत नाहीये. सोनम रघुवंशी हिने स्पष्ट केले की, नेपाळमध्ये पळून जाणार असल्याची अफवा आहे.

माझ्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी चुकीच्या बोलल्या जात आहेत. सोनमचा भाऊ गोविंद याने काही दिवसांपूर्वीच दावा केला होता की, आरोपी सोनम हिच्या आणि आमचा काहीच संबंध नाही. कुटुंबियांनी तिच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिच्याकरिता कोणताही वकीलही नियु्क्त केला नाही. तिच्या परिस्थितीवर तिला सोडले आहे. मात्र, त्यानंतर ज्यावेळी सोनम जेलमधून बाहेर आली, त्यावेळी सोनमचे वडील तिच्यासोबत दिसले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in