• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संसदेला घेरण्याचं षडयंत्र, पोलिसांच्या हत्येचं प्लानिंग, आंदोलकांवर गंभीर आरोप; एफआयआरमध्ये…

July 25, 2026 by admin Leave a Comment


देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सोमवारी तरुणांनी मोठं आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी तरुणांवर जोरदार लाठीमार केला. त्यामुळे अनेक तरुण जखमी झाले. अनेक तरुणांच्या डोक्यातून रक्त आलं. यावेळी दगडफेकीच्या घटनाही झाल्या. पोलीसही जखमी झाले आहेत. पोलिसांनी या आंदोलनातील आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्तव्य पथ पोलीस ठाण्यात पहिली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यात सनसनाटी खुलासे करण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांनी उपद्रवींच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नासहीत (BNS Section 109(1), भारतीय न्याय संहिताच्या 13 गंभीर आणि अजामिनपात्र कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्तव्य पथ पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या एका पोलीस इन्स्पेक्टरच्या लिखित तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यात 20 जुलै रोजी रफी मार्ग आणि रेल भवनाच्या चौकात जालेल्या भीषण हिंसेचा तपशील देण्यात आला आहे.

त्या दिवशी काय घडलं?

5 वाजताच पोलीस पोहोचले : तक्रारदार पोलीस निरीक्षकाच्या मते, त्याची ड्युटी पहाटे 5 वाजता C-Hexagon, जोन-11 (पिंक बूथ) येथे लावण्यात आली होती. वायरलेस सूचना मिळताच पोलीस दलाने रेल भवनला राऊंड मारला. त्यानंतर बॅरिकेड्सच्या दिशेने गेले. तिथे हजारो आंदोलक जमलेले होते.

कलम 163 (BNSS) च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष : पोलिसांनी वारंवार लाउडस्पीकरवरून घोषणा करून BNSS चे कलम 163 (जमावबंदी) लागू असून निदर्शने करण्याची परवानगी नसल्याचं सांगितलं. त्यानंतरही गर्दीतून घोषणाबाजी होत होती. गर्दी मागे हटायला तयार नव्हती.

संसदेकडे जाण्यासाठी गर्दीने उकसवले : एफआयआरमधील नोंदीनुसार, निदर्शनावेळी काही समाजकंटकांनी गर्दीला उकसवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कवच तोडून संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला.

हत्येच्या इराद्यानेच हल्ला : उपद्रवींनी पोलिसांना चोहेबाजूने घेरलं. सुरक्षाकर्मींना मारहाण केली. त्यांच्यावर दगड फेकले, बूट आणि चप्पलही फेकल्या. तसेच धारदार वस्तूही फेकल्या. गर्दीने पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्याच्या इराद्यानेच हल्ला केला होता, असं तक्रारीत स्पष्टपणे म्हटलंय.

सरकारी आणि खासगी मालमत्तेचं नुकसान : आंदोलकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या खासगी वाहनांची तसेच सरकारी संपत्तीची तोडफोड केली.

सुरक्षा दलाची अॅक्शन (लाठीचार्ज आणि अश्रूधूराच्या नळकांड्या) : जेव्हा गर्दी संसद आणि अति संवेदनशील संवैधानिक इमारतींच्या जवळ गेली. तेव्हा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

BNS च्या या 13 कलमांतर्गत गुन्हे दाखल

कर्तव्य पथ पोलीस ठाण्याच्या या पहिल्या एफआयआरमध्ये बीएनएसच्या 13 कलमांचा समावेश करण्यात आला आहे. खालील गुन्ह्यांशी संबंधित ही कलमं आहेत.

1. हत्येचा प्रयत्न (BNS Section 109(1))

2. सरकारी कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

3. सरकारी कामात अडथळा आणणे

4. बेकायदेशीरपणे जमणे

5. दंगल भडकवणे, हिंसा भडकवणे

6. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं नुकसान करणं

7. सामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात आणणे



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in