• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह…

August 12, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी सुरु असून, आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटासह आदिवासी विभागाच्या कारभारावर भाष्य केले.

शिवसेना कुणाची, पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचे, यावर काल सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद झाला. या प्रकरणातील सुनावणी अंतिम टप्प्यात असून, आज दुपारी पुन्हा युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर निशाणा साधला. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे आणि न्यायालयाचा निर्णय काय होतो, याची उत्सुकता वाढली आहे. अशी स्थिती आहे.

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आदिवासी विभागाच्या कारभारावर टीका करत त्यांनी सरकारच्या अर्थसंकल्पीय तरतुदींवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “आदिवासी खात्याला सरकार खूप बजेट देते. मात्र त्यांचेच पैसे सरकार ओरबडत आहे.”

राऊत यांनी पुढे आदिवासी भागातील मूलभूत सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. “स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला नाही असे अनेक आदिवासी पाडे आहेत. खाण मालकांसाठी तुम्ही हे करत आहात हे गंभीर आहेत. अदानीच्या घशात तुम्ही अमरावती येथील जमीन घालत आहात,” असा आरोप त्यांनी केला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Snake : साप पुन्हा आयुष्यात तुमच्या घराकडे फिरकणार नाही, आदिवासी लोकांची ही खास ट्रीक प्रत्येकाला माहिती हवीच
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…
  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड
  • MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in