• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय सीओई यांच्यात संवादाचा अभाव आहे का? गिल एका झटक्यात म्हणाला..

August 14, 2026 by admin Leave a Comment


श्रीलंका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. पण कसोटी मालिका तोंडावर येईपर्यंत दुखापतीमुळे तीन खेळाडूंना वगळण्यात आलं. जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या कसोटी मालिकेला मुकले आहेत. जसप्रीत बुमराहच्या जागी आकिब नबी आणि साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानला संघात संधी मिळाली आहे. पण आधी संघात निवड आणि नंतर दुखापतीमुळे डावलल्याने बराच गदारोळ झाला. संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयंच सेंटर ऑफ एक्सीलेंस यांच्यात संवादाचा अभाव असल्याच्या चर्चांना उधाण आलं. असं असताना भारत श्रीलंका कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला शुबमन गिल पत्रकार परिषदेला सामोरं गेला. त्यावेळी त्याला या वादाबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने या सर्व बातम्या चुकीच्या असून फेटाळून लावल्या.

संघ व्यवस्थापन आणि सीओईबाबत गिल काय म्हणाला?

शुबमन गिल म्हणाला की, ‘त्यांच्यासोबत आमचा सतत संवाद सुरू आहे. दुर्दैवाने साई सुदर्शनच्या खेळात आम्हाला हवी तशी सुधारणा झाली नाही. कसोटी सामन्यात आम्ही धोका पत्कारू शकत नाही. आम्हाला आमच्या निवडलेल्या 15 खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे.’ कसोटी सामन्याचा कालावधी मोठा असतो आणि पूर्णपणे फिट नसलेल्या खेळाडूच्या बाबतीत कोणताही धोका पत्कारणे परवडणारं नाही, असंही गिल पुढे म्हणाला. कसोटी सामना पाच दिवसांचा असतो, जर वनडे किंवा टी20 असता तर गोष्ट वेगळी असते. कसोटी सामन्यात धोका पत्कारण्यासारखं नसतं. पण इतर खेळाडूंना अधिक संधी मिळते, हे देखील तो सांगण्यास विसरला नाही.

‘भारतीय संघात अपेक्षित खेळाडू नाही म्हणून त्याचा संघाच्या मनोधैर्यावर फारसा परिणाम झाला नाही. आमच्या 15 जणांच्या संघात कोणीही असो किंवा आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये कोणालाही संधी देऊ शकतो. ते चांगली कामगिरी करून सामना जिंकू शकतात.’ असंही शुबमन गिल म्हणाला. संघात बदल झाले असले तरी, मालिकेपूर्वी भारताची पुरेशी तयारी झाली आहे, असंही तो सांगण्यास विसरला नाही. कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी 10 दिवस मिळाले त्याचा टिम इंडियाला नक्कीच फायदा होईल, असंही तो पुढे म्हणाला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mohammed Shami : ‘तू फार्महाऊसवर वेश्या बोलावतो, मी तर…’, बायकोने मोहम्मद शमीवर पुन्हा उडवले शिंतोडे, पोस्ट चर्चेत..
  • आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 24 तासांपेक्षा अधिक गोळीबार, 47 लोकांचा मृत्यू, 50 जणांचं अपहरण, मोठी खळबळ
  • IND vs SL: मोठा भाऊ बेंचवर बसूनच राहिला, तर छोट्या भावाने मात्र मैदान गाजवलं
  • Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने पाकिस्तानचा अणवस्त्र तळ किराना हिल्सवर हल्ला केलेला का? माजी CDS अनिल चौहान यांचा मोठा खुलासा
  • मुंबईतील कोस्टल रोड आणि वरळी-सी लिंकवर या वाहनांना कायमची बंदी? वाचा नवे निर्बंध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in