• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

श्री कृष्ण मुस्लिम होते, 5 वेळा नमाज पठण करायचे; मौलानांच्या वक्तव्याने नवा वाद, हिंदुत्ववादी संघटना भडकल्या

July 16, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशच्या मथुरातील श्री कृष्ण जन्मभूमीचा वाद चांगलाच तापला आहे. या वादादरम्यान मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. श्री कृष्ण हे मुस्लिम होते. ते 5 वेळा नमाज पठण करायचे, असं वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी मौलानांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. तर काही हिंदूत्ववादी संघटनांनी मौलाना यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

मौलाना जर्जिस अन्सारी यांनी एका भाषणादरम्यान श्रीमद्भगवद्गीतेच्या एका श्लोकाचा संदर्भ देत विधान केल्याचा दावा केला आहे. त्यांनी एका श्लोकाचा अर्थ सांगताना म्हटलं की, ‘भक्तांनी संपूर्ण शरीराने पूजा करायला पाहिजे’, असं सांगून त्यांनी श्रीकृष्ण हे मुस्लिम असून ते 5 वेळा नमाज पठण करायचे, असा दावा केला आहे.

मौलाना यांनी पुढे म्हटलं की, ‘हिंदू धर्माच्या लोकांना ग्रंथ काळजीपूर्वक वाचल्यानंतर इस्लाम धर्म चांगला वाटायला लागेल. इस्लाम धर्म हा वैश्विक असल्याचे हिंदू धर्मग्रंथातच म्हटलं आहे. परंतु मौलानांचं हे विधान जुनंच आहे. आता त्यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मौलानांचा दावा खरा आहे का?

एका रिपोर्टनुसार, मौलाना यांनी वक्तव्यात श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकाचा चुकीचा अर्थ सांगितला आहे. भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील दहावा श्लोक आहे’.

श्लोकामधील नेमकं अर्थ काय?

रिपोर्टनुसार, योगाभ्यास करणाऱ्याचे कर्तव्य आहे की, मन, शरीर आणि आत्मा ईश्वराला समर्पित करावे. त्यांनी एकांतात जाऊन मन आणि इंद्रिये नियंत्रित करावीत. सर्व इच्छा आणि आसक्तीपासून मुक्त राहावे. या श्लोकात इस्लामचा कुठेही उल्लेख नाही.

हिंदूत्ववादी संघटना आक्रमक

हिंदू संघटनांनी मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मौलानाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. काहींनी मौलाना अन्सारी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मौलाना जर्जिस अन्सारी यांनी 2022 साली देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, ‘मुस्लिम महिलांनी प्रसुती वेदना होत असतानाही पतीच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यास तयार राहिलं पाहिजे. त्यांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून जोरदार निषेध झाला होता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना कसला दिखावा, ना मोठेपणा…दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral
  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
  • थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in