• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्ययात्रेत दहशतवाद्यांची गर्दी, व्हिडिओ समोर आल्याने खळबळ

June 26, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानचा माजी घातक वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा मोठा भाऊ शाहिद अख्तरचे निधन झाले आहे. शाहिद यांच्या अंत्ययात्रेत अनेक वादग्रस्त व्यक्ती हजर होते अशी माहिती समोर आली आहे. इस्लामाबादमधील H-8 कब्रस्तानात पार पडलेल्या या अंत्यविधीला क्रीडा, राजकारण आणि इतर क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात पाकिस्तानातील बंदी घालण्यात आलेल्या लश्कर ये तोयबा आणि त्याच्याशी संबंधित राजकीय संघटना PMML शी संबंधित काही नेते दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

PMML शी संबंधित नेत्यांची उपस्थिती

शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. LeT आणि PMML शी संबंधित अधिकृत मीडिया विंगनेच या अंत्यविधीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसिद्ध केली असल्याची माहिती समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये PMML इस्लामाबादचे अध्यक्ष इनाम-उर-रहमान काम्बोह हे आपल्या सहकाऱ्यांसह आणि LeT शी संबंधित काही व्यक्तींसोबत उपस्थित असल्याचे दिसत आहे. ते केवळ अंत्यविधीत सहभागी झाले नाहीत, तर शोएब अख्तर यांच्या कुटुंबीयांच्या जवळही गेल्याचे समोर आले आहे.

हे नेते कोण आहेत?

PMML ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध असलेल्या हाफिज सईद यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. JuD आणि लष्कर-ए-तैयबा यांच्यावर निर्बंध लागू झाल्यानंतर मुख्य प्रवाहातील राजकारणात प्रवेश करण्याच्या उद्देशाने PMML ची स्थापना करण्यात आल्याचे अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. व्हिडिओतील इनाम-उर-रहमान काम्बोह हे PMML चे इस्लामाबादमधील प्रमुख नेते मानले जातात. त्यांच्या सोबत उपस्थित असलेल्या काही व्यक्तींचेही LeT च्या जुन्या नेटवर्कशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

येथे पोस्ट पाहा –

🔸Shahid Akhtar dies of heart failure

– Brother of Pakistani cricketer Shoaib Akhtar

– Entire Lashkar-e-Taiba leadership came to his funeral

– हम कुछ नहीं बोलेगे

PKMKB pic.twitter.com/cw8lQq1bHY

— Kreately.in (@KreatelyMedia) June 26, 2026

हे नेते का उपस्थित होते?

या अंत्यविधीचे फोटो समोर आल्यानंतर LeT शी संबंधित या नेत्यांचे शोएब अख्तर यांच्या कुटुंबाशी नेमके काय संबंध आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. तज्ज्ञांच्या मते पाकिस्तानमध्ये अनेकदा प्रसिद्ध व्यक्ती किंवा क्रिकेटपटू सामाजिक किंवा स्थानिक दबावामुळे धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या कार्यक्रमांशी जोडले जातात किंवा त्यांच्या खासगी कार्यक्रमांना येणाऱ्या व्यक्तींना रोखू शकत नाहीत. याचाच हा भाग असल्याचे समोर आले आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in