• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शेवटचा सेल्फी बायकोला पाठवला, मेलो म्हणून…मोशी दुर्घटनेतून वाचलेल्याने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव, 8 जणांचा मृत्यू!

July 11, 2026 by admin Leave a Comment


Pune Moshi Accident : पुण्यातील मोशी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. वेस्ट-टू-एनर्जी या प्रकल्पातील एक इमारत कोसळल्याने त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आठ मृतदेहांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. इमारतीतील रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे. मात्र एक व्यक्ती बाहेरच्या कचऱ्याखाली दबलेला आहे. त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. तशी माहिती पालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे. दरम्यान, याच दुर्घटनेत बचावलेल्या विजय सकपाळ यांनी नेमकं काय घडलं होतं? तसेच मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आलो, याबाबतही त्यांनी सांगितलं आहे. आता मरण अटळ असल्याचे समजून त्यांनी आपल्या पत्नीला अखेरचा सेल्फीदेखील पाठवला होता. परंतु सुदैवाने त्यांचे प्राण बचावले आहेत.

पाय थेट एका पिलरखाली दाबला गेला

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील इमारती दुर्घटनेतून सुखरूप बाहेर पडलेल्या नागरिकांचे अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत. ज्यामध्ये विजय सपकाळ या तरुणाची मृत्यूशी दिलेली झुंज थक्क करणारी ठरली आहे. या दुर्घटनेत इमारतीमध्ये अडकलेल्या विजयचा पाय थेट एका पिलरखाली दाबला गेला होता. तर खाली खिडकीच्या फुटलेल्या काचा पसरलेल्या होत्या. आपण आता यातून जिवंत वाचणार नाही अशी खात्री पटल्याने, त्याने अखेरचा निरोप समजून आपल्या पत्नीला मोबाईलवरून सेल्फी, व्हिडिओ आणि मेसेज पाठवला होता.

पत्नी आणि मुलीला पाहून त्याला अश्रू अनावर

मात्र, बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल ११ तासांनंतर त्याला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात यश आले. रुग्णालयात उपचारादरम्यान जेव्हा तो बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आला, तेव्हा समोर उभ्या असलेल्या आपल्या पत्नी आणि मुलीला पाहून त्याला अश्रू अनावर झाले; काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या प्रसंगातून विजयचा झालेला पुनर्जन्म सध्या सर्वांनाच भावुक करत आहे.

एक कर्मचारी बेपत्ता, शोध सुरू

दरम्यान, दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, अग्निशमन दल, महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मात्र, अजूनही एक कर्मचारी बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू आहे. अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू असल्याने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO, सद्गुरुंचे 77 अनुयायी कुठे?
  • झोप उडवणारी बातमी… नेपाळमध्ये पुन्हा महाजलप्रलय? 47 हिमनद्या वितळण्याचा धोका
  • Abhijeet Dipke: मी अमेरिकेतून तुरुंगात जाण्यासाठीच आलो; अभिजीत दीपकेंच्या नव्या वक्तव्याने वेधले लक्ष
  • नेपाळमध्ये आलेला पूर Made in China का? अखेर बिजींगने दिलं उत्तर
  • नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in