• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शेतकऱ्याने जमिनीत पुरले पाच लाख, वर्षभराने पिशवी बाहेर काढताच बसला मोठा धक्का, अख्खं गाव हळहळलं

August 9, 2026 by admin Leave a Comment


राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहणार्‍या शेतकर्‍याने आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी एक युक्ती केली, मात्र ही युक्ती नंतर त्याला चांगलीच महागात पडली आहे. ही घटना बालोतरा जिल्ह्यातल्या नेवाई गावात घडली आहे. मांगीलाल मेघवाल असं या शेतकऱ्याचं नाव आहे, मांगीलाल मेघवाल यांनी एक वर्षापूर्वी आपला एक प्लॉट विकला होता. या प्लॉटचे त्यांना पाच लाख रुपये मिळाले होते. मांगीलाल आपल्या कुटुंबासोबत एका छोट्याशा मातीच्या घरात राहतात. त्यामुळे त्यांना जे पैसे मिळाले होते, त्या पैशांमधून आपन आपल्या कुटुंबासाठी सिमेंटचं पक्क घर बांधू असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र हे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी त्यांनी ते आपल्या शेतात पुरून ठेवले.

आपले पाच लाख रुपये सुरक्षित राहावेत यासाठी या शेतकऱ्याने पैसे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकले आणि ही पिशवी शेतात एक मोठा खड्डा खांदून पुरून टाकली. या शेतकऱ्याने आपण शेतात पैसे पुरले आहेत, याची कल्पना आपल्या बायकोला आणि मुलांना देखील दिली नाही. परंतु या घटनेमध्ये मोठा ट्विस्ट आला. मांगीलाल यांना दारूचं व्यसन होतं, त्यामुळे आपण कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, हे ते विसरून जायचे. सवयीप्रमाणे ते त्यांनी हे पैसे शेतात नेमके कुठे ठेवले आहेत, हे विसरले, त्यांना जी जागा लक्षात राहिली नाही.

काही दिवसांनंतर जेव्हा सिमेंटचं घर बांधायचं होतं. तेव्हा अचानक मांगीलाल यांच्या लक्षात आलं की, आपण पाच लाख रुपये शेतात पुरून ठेवले होते. परंतु ते पैसे त्यांनी नेमके कुठे ठेवले हे काही त्यांना आठवत नव्हतं. ज्या जमिनीमध्ये त्यांनी हे पैसे पुरले ती जमीन तब्बल दहा एकर होती. त्यानंतर त्यांनी ही गोष्ट आपल्या कुटुंबाला सांगितली, त्यानंतर मांगीलाल आणि त्यांच्या कुटुंबांनी त्या संपूर्ण शेत जमिनीमध्ये पैशांचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र त्यांना काही त्यात यश आलं नाही. कुटुंबाने या पैशांची आशा सोडून दिली.

परंतु एक वर्षाने जेव्हा पाऊस सुरू झाला, जमिनीत पेरणीची वेळ आली, तेव्हा त्यांनी ज्या पिशवीमध्ये हे पैसे पुरून ठेवले होते. ती पिशवी अचानकवर आली, जेव्हा कुटुंबाने ही पिशवी उघडून पाहिली, तेव्हा त्या पिशवीमध्ये पाचशे -पाचशेच्या नोटा असल्याचं त्यांना दिसलं. समोरचं दृश्य पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला, परंतु तोपर्यंत खूप उशिर झाला होता, या सर्व पैशांना वाळवी लागली होती, अर्ध्यापेक्षा अधिक नोटा वाळवीने खाऊन टाकल्या होत्या. यामुळे अख्खं गाव हळहळं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
  • मोठी बातमी! लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार? वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट!
  • Tapsee pannu : तुम्हाला फार मजा येत्ये का ? कंगनाचं नाव काढताच भडकली तापसी पन्नू, फटकारत म्हणाली..
  • मराठी सक्तीचा वाद चिघळला, रिक्षा-टॅक्सी चालकाची थेट हायकोर्टात धाव, याचिकेत आरोप काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in