• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शेतकऱ्यांच्या पैशांतून बनलेला चित्रपट, अभिनेत्याने 45 दिवस बदलले नव्हते कपडे, चित्रपटाने रचलेला इतिहास

June 26, 2026 by admin Leave a Comment


भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट त्यांच्या कथेमुळे गाजले तर काही चित्रपट त्यांच्या निर्मितीच्या अनोख्या प्रवासामुळे कायम स्मरणात राहिले. 1976 साली प्रदर्शित झालेला 'मंथन' हा असा एक ऐतिहासिक चित्रपट आहे, ज्याने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत तर भारतीय सिनेमात नवी परंपराही सुरू केली.

विशेष म्हणजे, हा चित्रपट कोणत्याही मोठ्या निर्मात्याने किंवा स्टुडिओने आर्थिक मदत करून तयार केला नव्हता. गुजरातमधील तब्बल पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन रुपये देऊन या चित्रपटाच्या निर्मितीस हातभार लावला होता.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शेतकरी बैलगाड्या, ट्रक आणि इतर वाहनांमधून मोठ्या संख्येने थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते. कारण हा चित्रपट त्यांचाच होता आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी मोठ्या पडद्यावर दाखवत होता.

दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला 'मंथन' हा चित्रपट गुजरातमधील दुग्ध सहकारी चळवळ, ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकार चळवळीची ताकद आणि सामाजिक परिवर्तन यांचे वास्तववादी चित्रण या चित्रपटात करण्यात आले.

चित्रपट अधिक वास्तववादी वाटावा यासाठी श्याम बेनेगल यांनी चित्रीकरणादरम्यान अनेक प्रयोग केले. उपलब्ध माहितीनुसार, गावातील वातावरण आणि पात्रांचा नैसर्गिकपणा टिकून राहावा म्हणून कलाकारांनी जवळपास 45 दिवस एकाच प्रकारचे कपडे परिधान केले होते. प्रदर्शनानंतर 'मंथन'ला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही मोठी दाद मिळाली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विशेषतः स्मिता पाटील यांच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप सोडली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in