• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शहरांची कनेक्टिविटी वाढणार, नव्या 7 अमृत भारत ट्रेन सेवेत दाखल होणार, मुंबईतून कुठे धावणार? जाणून घ्या

August 15, 2026 by admin Leave a Comment


भारतात रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. सध्या देशात विविध शहरात पोहोचण्यासाठी आधीपासून एक्स्प्रेस, वंदे भारत ट्रेन आता नव्याने अमृत भारत ट्रेन देखील दाखल होत आहेत. आता केंद्र सरकारने 7 नव्या अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेनला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतातील उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतात पोहोचणे सोपे होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना देशातील विविध शहरात कमीत तिकीट दरात जाणे शक्य होणार आहे.

अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेनचा खास प्रवासी वर्ग डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलीआहे. मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवूनच या ट्रेनची निर्मिती केल्याचं सांगण्यात येत आहे. या ट्रेनचे तिकीट हे प्रिमियम ट्रेनच्या तुलनेत कमी आहे. यामुळे प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास अगदी कमी तिकीट दरात होणार आहे. तसेच आरामदायी देखील होणार आहे.

धनबाद-कोयंबटूर अमृत भारत एक्स्प्रेस

धनबाद, कोयंबटूर दरम्यान धावणारी ही ट्रेन अनेक राज्यातून धावणार आहे. ही ट्रेन गोमो, पारसनाथ, कोडरमा, गया, सासाराम, प्रयागराज, छिवकी, कटनी, जबलपूर , इटारसी, नागपूर, चंद्रपूर, वारंगल आणि विजयवाडा सारख्या प्रमुख स्थानकांवर थांबेल.

प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस

ही ट्रेन प्रयागराजहून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावणार आहे. ट्रेन ही प्रयागराज, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, कल्याण स्थानकांवर थांबेले. ही ट्रेन आठवड्यातून एकदा चालवण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

सुबेदारगंज-लोकमान्य टिळक टर्मिनस

सुबेदारगंजवरून ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावणार आहे. आठवड्यातून एकदा ही ट्रेन चालवण्यात येईल. या मार्गात ही ट्रेन फतेहपूर, गोविंदपूर, बांदा, चित्रकूटधाम, सतना, कटनी , जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, ठाणे या स्टेशनवर थांबणार आहे.

गोरखपूर-दिल्ली अमृत भारत एक्स्प्रेस

गोरखपूरहून दिल्लीला ही ट्रेन धावणार आहे. या ट्रेनमुळे उत्तर प्रदेशातील नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार आहे. ही ट्रेन खलीलाबाद, बस्ती, गोंडा, सीतापूर, बरेली, मुरादाबाद, गाझियाबाद या स्टेशनवर थांबणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून एकदा चालवण्यात येईल.

प्रयागराज-उधना अमृत भारत एक्स्प्रेस

प्रयागराजहून गुजरातला ही ट्रेन धावणार आहे. या ट्रेनच्या मार्गात फतेहपूर, इटावा, टूंडला, आगरा, बयाना, गंगापूर सिटी, सवाई माधोपूर, कोटा, रतलाम, वडोदरा स्थानकावर थांबेल.

गोरखपूर-वांद्रे टर्मिनस

गोरखपूर-वांद्रे टर्मिनस ही ट्रेन आठवड्यातून एकदा चालवली जाईल. या ट्रेनच्या मार्गात बस्ती, गोंडा, कानपूर, कानपूर, आग्रा किल्ला, कोटा, रतलाम, वडोदरा, सूरत, वलसाड, वापी, बोरीवली, वांद्रे टर्मिनस या स्थानकांचा समावेश असेल.

चारलापल्ली-गोरखपूर अमृत भारत एक्स्प्रेस

सातवी ट्रेन ही चारलापल्लीहून गोरखपूरदरम्यान धावणार आहे. ही ट्रेन काडीपेट, पेड्डापल्ली, मंचेरियाल, बल्हारशाह, नागपूर, बैतूल, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर, लखनऊ, गोमतीनगर, बाराबंकी, गोंडा, गोरखपूर स्टेशनवर थांबेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in