• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का? माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? थेट विधान परिषदेचे तिकीट मिळण्याची शक्यता

May 26, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते भाजपच्या तिकिटावर अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक लढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तनपुरे यांनी जयंत पाटील यांचा प्रोफाइल फोटो ठेवून तसे संकेत दिले आहेत. याआधी तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतून भाजपसाठी माघार घेतली होती. त्यामुळे आता ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर?

समोर आलेल्या माहितीनुसार, प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तनपुरे यांचे नाव महायुतीकडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे. भाजपसह मित्रपक्षांमध्येही याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता येत्या एक दोन दिवसात प्राजक्त तनपुरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी तनपुरे यांनी जयंत पाटील यांचा हात जोडलेला फोटो पोस्ट केला आहे, त्यामुळे आता त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली होती माघार

महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राहुरी पोट निवडणुकीत प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र प्राजक्त तनपुरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक फोन केला आणि त्यानंतर तनपुरे यांनी माघार घेतली होता. त्यामुळे आता तनपुरे यांना भाजपकडून विधानपरिषदेवर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीतून उमेदवारी जाहीर होणार

विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आज दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्ली दौऱ्यात चव्हाण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेचा फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावे व इतर बाबींची तपशीलवार माहिती ते पक्ष नेतृत्वाला देणार आहेत. त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांत भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यात प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashwin : तुम्ही वैभव सूर्यवंशीचा तिरस्कार कसा करु शकता? दांबुलच्या वादानंतर अश्विनच्या संतापाचा स्फोट
  • Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा
  • 2 तास 16 मिनिटांचा सस्पेन्स चित्रपट; ‘दृश्यम 3’सारखाच तगडा क्लायमॅक्स
  • Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आज भाव चांगलेच घसरले… जाणून घ्या दर पटापट
  • गुटखा मिळेना परप्रांतीयाचा तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in