• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वैभव सूर्यवंशीचं दुबळ्या बाजूवर जोरदार काम सुरू, 10 दिवसांसाठी एकाच ठिकाणी तळ ठोकला

August 7, 2026 by admin Leave a Comment

वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीला इंग्लंड दौऱ्यापासून सुरूवात झाली आहे. या दौऱ्यात त्याच्या फलंदाजीतून काही खास घडलं नाही. पण त्याची वसुली त्याने झिम्बाब्वे दौऱ्यातील टी20 मालिकेत केली. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने या मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावून विक्रम रचला. झिम्बाब्वे दौरा संपल्यानंतर आता टी20 मालिकांसाठी अवकाश असून टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला पुन्हा मैदानात खेळताना पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण वैभव सूर्यवंशीने मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर फायदा उचलण्याचं ठरवलं आहे. त्याने क्रिकेटमधील दुबळी बाजू सावरण्यासाठी जोरदार सराव सुरू केला आहे. व्हाईट बॉल सारखीच कामगिरी रेड बॉलमध्ये करण्यासाठी घाम गाळण्यास सुरूवात केली आहे.

वैभव सूर्यवंशीला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी रेड बॉल क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन दिलं आहे. वैभव सूर्यवंशीनेही सकारात्मक दृष्टीने मनावर घेतलं आहे. क्रिकेटच्या मोठ्या फॉर्मेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याचं ध्येय मनाशी बाळगलं आहे. यासाठी त्याने जोरदार सराव सुरू केला आहे. रेड बॉलचा सामना मजबूतीने करण्यासाठी सध्या सराव शिबिरात सहभागी होत आहे. पण हा सराव बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये नाही तर राजस्थान रॉयल्सच्या अकादमीत करत आहे. वैभव सूर्यवंशी महाराष्ट्रातील तळेगाव येथील राजस्थान रॉयल्सच्या अकादमीत सराव करत आहे.

राजस्थान रॉयल्स अकादमीत 10 दिवसांचं हंगामपूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित केला आहे. या प्रशिक्षण शिबिरात फ्रेंचायझीचे अनेक खेळाडू सराव करत आहे. फ्रेंचायझीचे फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखील वैभव सूर्यवंशी रेड बॉलने फलंदाजीचा सराव करत आहे. वैभव सूर्यवंशी देशांतर्गत क्रिकेटमध्ये लवकरच दुलीप ट्रॉपी 2026 स्पर्धेत खेळणार आहे. रेड बॉल स्पर्धा असल्याने वैभवच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. रेड बॉल क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करू शकतो हे दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी त्याने जोरदार सराव सुरू केला आहे. इतकंच ईस्ट झोन विभागासाठी त्याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. वैभवने आतार्यंत 10 प्रथम श्रेणी सामन्यात एका अर्धशतकासह 17च्या सरासरीने फक्त 207 धावा केल्या आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?
  • सेलिब्रेशन असावे तर असे! ना उडी मारली, ना कसा दिखावा, ध्रुव जुरेलने बायसेपवरील टॅटू दाखवला, Video Viral
  • Manoj Jarange : सरकारला धडकी भरवणारी घोषणा! मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, 29 तारखेला काय होणार?
  • मालकाच्या मृत्यूनंतर कुत्र्याने दाखवली निष्ठा; 41 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकताना प्रत्येकजण रडतो
  • मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in