• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘वेलकम टू द जंगल’चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका, पहिल्याच दिवशी छापले इतके कोटी

June 27, 2026 by admin Leave a Comment


2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘वेलकम टू द जंगल’ने अखेर मोठ्या पडद्यावर दमदार एंट्री घेतली आहे. रिलीज पूर्वी या मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपटाची प्रचंड चर्चा होती आणि त्याचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसवर स्पष्टपणे दिसून आला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने समाधानकारक कमाई करत निर्मात्यांच्या अपेक्षांना बळ दिले आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘कॉकटेल 2’ सह अनेक हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही ‘वेलकम टू द जंगल’ ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विनोदी कथानक, मोठी स्टारकास्ट आणि लोकप्रिय फ्रँचायझीचा वारसा यामुळे चित्रपटाला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळाला.

पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कमाई

बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग वेबसाइट सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘वेलकम टू द जंगल’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 15 कोटी रुपयांची नेट कमाई केली. याशिवाय रिलीजपूर्वी झालेल्या पेड प्रीव्ह्यू शोमधून 3.75 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 18.75 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जागतिक स्तरावरही चित्रपटाने दमदार कामगिरी करत 29 कोटी रुपयांचा ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन नोंदवला आहे. आगामी शनिवार आणि रविवारीही चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रेलरपासूनच निर्माण झाली होती उत्सुकता

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अनेक वर्षांनंतर ‘वेलकम’ फ्रँचायझीचा नवा भाग पाहण्यासाठी चाहते आतुर होते. चित्रपट रिलीज होताच अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी सिनेमागृहांकडे गर्दी केली.

‘वेलकम टू द जंगल’मध्ये बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र दिसत आहेत. चित्रपटात अक्षय कुमार, दिशा पटानी, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, जॉनी लीव्हर, परेश रावल, राजपाल यादव, सुनील शेट्टी, अरशद वारसी, तुषार कपूर, आफताब शिवदासानी आणि फरीदा जलाल यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. या मोठ्या स्टारकास्टमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली होती.

‘वेलकम’ फ्रँचायझीचा यशस्वी प्रवास

‘वेलकम’ फ्रँचायझीचा पहिला चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या दिग्दर्शनाखाली आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आणि बॉक्स ऑफिसवरही मोठे यश मिळवले. यानंतर 2015 मध्ये ‘वेलकम बॅक’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय कुमार दिसला नाही, मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुलढाणा : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप..
  • तुकाराम मुंढेंचा दणका! 37 हॉटेल्सवर धाडी, 4 आस्थापनांचे परवाने निलंबित, संपूर्ण राज्यात खळबळ
  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in