• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विहिरीत उसळल्या समुद्रासारख्या लाटा; रहस्यमय घटनेनंतर अधिकारी गावात; तपासात कारण समोर

August 8, 2026 by admin Leave a Comment


गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील वीरपर्दा गावातून रहस्यमय प्रकार समोर आला आहे. या गावातील रहस्यमय प्रकाराने संपूर्ण गावात दहशत पसरली आहे. गावकरी घाबरून मंदिरात पूजा करू लागले आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या विहिरीजवळ लोकांची एकच गर्दी पाहायला मिळते. गुजरातच्या मोरबीमधील वीरपर्दा गावात 18 फूट खोल विहिरीत चार दिवसांपासून लाटा उसळू लागल्या आहेत. वीरपर्दा गावातील राष्ट्रीय हायवेजवळील या रहस्यमय घटनेचा व्हिडिओ सर्वसामानांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

रहस्यमय विहिरीची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या लाटांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर या विहिरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इतर गावातूनही काही नागरिक मोरबीमध्ये येऊ लागले आहेत. या विहिरीत पाणी उसळताना दिसत आहे. गावातील शेकडो गावकरी मोठ्या उत्साहाने दिवसातून एकदा विहिरीजवळ हजेरी लावत आहेत.

दोन दिवसांपूर्वी विहिरीत लाटा उसळताना दिसल्या. त्यानंतर काल दुपारी विहिरीतून लाटा उसळणे बंद झाले होते. त्यानंतर दुपारी 3 वाजता पुन्हा विहिरीत लाटा उसळणे सुरू झाल्या. या विहिरीत लाटा का उसळताहेत, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गावकऱ्यांच्या मते, गावातील हा परिसरात भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. त्यामुळे भूभर्गीय हालचालीमुळे विहिरीत लाटा उसळत असू शकते. परंतु या कारणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

व्हायरल व्हिडिओनंतर प्रशासनाचे अधिकारी मोरबीच्या वीरपर्दा गावात पोहोचले. त्यांनी विहिरीतील पाण्याची पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुसळधार पावसमुळे विहीर पुन्हा भरली असावी. त्यात जोरदार वाऱ्यामुळे विहिरीतील या पाण्याची हालचाल झाली असावी. परंतु या ठिकाणी भूकंपासारख्या कोणत्याही हालचालीची चिन्हे आढळून आलेली नाही. विहिरीतील पाणी नेमकं का उसळत आहे, याचं कारण सखोल तपासानंतरच समोर येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु आता वीरपर्दा गावातील ही विहिर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. काही जण भूकंपाच्या भीतीने घाबरून गेले आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी भूकंपाचा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
  • सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
  • Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
  • तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून नागपुरात आणा… महिलेची काठमांडूत बिघडली तब्येत; कुटुंबीयांचा फडणीस, गडकरींकडे टाहो
  • सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in