• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विषारी सापांच्या प्रजनन हंगामाला सुरुवात, पक्षी आणि सापांच्या अड्यांतील फरक कसा ओळखायचा?

July 13, 2026 by admin Leave a Comment


पावसाळा सुरू झाला आहे. याच काळात सापांच्या प्रजनन हंगामाला देखील सुरुवात होते. अनेकदा साप अशा ठिकाणी अंडी देतात, जिथे सहसाहा कुणी पोहोचू शकणार नाही. परंतु साप आणि पक्ष्याची अंडी काही प्रमाणात सारखीच दिसत असल्याने अनेकदा आपला गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे मोठा धोका होण्याची देखील शक्यता असते. या काळात साप अधिक आक्रमक बनतात. जर एखाद्या ठिकाणी सापाने अंडी दिलेली असतील आणि त्या ठिकाणी चुकून आपण जर गेलो तर साप आपल्या अंड्यांच्या संरक्षणासाठी हल्ला देखील करू शकतो. साप आणि पक्ष्यांची अंडी दूरून सारखीच वाटतात मात्र तुम्ही जर या दोन्ही अंड्याचं बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला दोन्ही अंड्यांमधील फरक स्पष्टपणे दिसून येईल.

साप आणि पक्ष्याच्या अंड्यामध्ये नेमका काय फरक असतो? 

सापांच्या अंड्याचा रंग हा थोडासा पिवळसर असतो, तर पक्ष्याच्या अंड्याचा रंग हा पांढरा असतो. सापाचे अंडे हे रबरासाखरे मऊ असतात, ते हातात घेतल्यास खूप गुळगुळीत असल्याचं जाणवत. परंतु पक्ष्याच्या अंड्याचं तसं नसतं, पक्ष्याची अंडी ही सापांच्या अंड्याच्या तुलनेमध्ये खूप टणक असतात, आणि प्रत्येक अंडं हे दुसऱ्या अंड्यापासून वेगळं ठेवलेलं असतं. परंतु सापांच्या अंड्यामध्ये असं दिसून येत नाही. ही अंडी शक्यतो एकमेकांना चिकटलेली असतात.  हा साप आणि पक्ष्याच्या अंड्यामधील महत्त्वाचा फरक आहे.  काही मोजके पक्षी सोडले तर इतर पक्षी शक्यतो जमिनीवर अंडी देत नाहीत, ती झाडावर घरट्यातच अंडी देतात. परंतु साप हा जमिनीवर अंडी देतो.

भारतामध्ये विषारी सापाच्या प्रमामुख्याने चार जाती आढळतात, त्यामध्ये नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार या चार जातींचा समावेश होतो. भारतात सापांच्या ज्या काही प्रजाती आढळून येतात, त्यातील काही प्रजाती या थेट पिल्लांना जन्म देतात, तर काही प्रजाती या अंडे देतात. शक्यतो जिथे अडचण असेल, झाडांचा पालापाचोळा पडलेला असेल अशा ठिकाणी अडोश्याला साप अंडी देतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून… नवनाथ बन यांचा काँग्रेस नेत्यावर तो गंभीर आरोप, म्हणाले राहुल गांधी…
  • Manoj Jarange On Hunger Strike | ‘कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या’ मनोज जरांगेचं मोठं आवाहन
  • मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनाच्या एक दिवस आधीच राज्य सरकारचा मोठा निर्णय; थेट समितीलाच…
  • मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला, अहिल्यानगरमध्ये वातावरण पेटलं
  • Kriti Sanon: माफ करा, माझी मुलंही असे कपडे घालतात पण..; क्रिती सनॉनच्या जाहिरातीवर प्रियांका चोप्राची आई स्पष्टच बोलली..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in